आपल्याला प्रत्येक गोष्टीचीच घाई झालेली असते. या घाई- गडबडीच्या नादात मग जेवण किंवा चहा- कॉफी (burning tongue due to hot food) पिणं या गोष्टी देखील आपण अगदीच वेगात करायला जातो.. आणि मग तो पदार्थ किती गरम आहे, याचा अंदाज न आल्याने तोंड पोळतं. जिभेला चांगलाच चटका बसतो. एकदा का जिभेला असा जोरात चटका बसला की मग पुढचे २- ३ दिवस काही सुधरत नाही. लहान मुलांच्या बाबतीतही असा किस्सा अनेकदा घडतो. त्यामुळेच तर घाई- गडबडीत खाताना, पिताना जर चटका बसलाच तर हे काही उपाय करा. पोळलेल्या जिभेला (Home Remedies On Burnt Tongue) थंडावा मिळेल आणि लवकर आराम पडेल.
जीभ पोळली तर करून बघा ३ उपाय
१. दही
गरम खाल्ल्यानंतर बऱ्याचदा जिभेसोबतच घशालाही चटका बसलेला असतो. या दोन्ही ठिकाणचा त्रास कमी होण्यासाठी दही आणि साखर एकत्र करून खा. पण दही खूप आंबट नसावं. नाहीतर त्याने आणखी त्रास होऊ शकतो.
२. आइस्क्रिम
चटका बसला असेल तर लगेचच थंडगार आइस्क्रिम खाल्ल्यानेही आराम मिळू शकतो.
बिपाशा बसू म्हणते मला डोहाळे लागलेत, सारखा खावासा वाटतोय हा 'गोड' पदार्थ
यासाठी आईस्क्रिमचे प्लेन व्हॅनिला, मँगो, पिस्ता, गुलकंद असे फ्लेवर निवडा. दुसरे मिक्स फ्लेवर्स असतील तर घशाला त्रास होऊ शकतो.
३. पुदिना
पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले घटक जिभेचा दाह कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
खूप घाम येतो- सतत घामाची दुर्गंधी? करा २ योगमुद्रा... अतिरिक्त घाम येणं होईल कमी!
यासाठी पुदिन्याची पाने धुवून स्वच्छ करून घ्या. खलबत्त्यात टाकून थोडी कुटून घ्या. या पानांमध्ये थोडासा मध टाका आणि हे मिश्रण चावून चावून खा. पोळलेल्या ठिकाणी थंड वाटू लागेल.