Join us  

किचनमध्ये मुंग्यांचा सुळसुळाट झालाय? ४ ट्रिक्स, घरात मुंग्या-माश्या अजिबात दिसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 8:37 AM

How to get rid from ants in kitchen : मुंग्यांना पळवण्यासाठी सोपे उपाय करून तुम्ही हा त्रास कायमचा दूर करू शकता. (How to Get Rid of Ants in the Kitchen)

घरात असं कोणतंही ठिकाण नसेल जिथे मुंग्या येत नाहीत. प्रत्येकाच्या घरात मुंग्याचा वावर असतो. अन्नकण पडलेले असतील तर लगेच त्या ठिकाणी मुंग्या लागता आणि रांग लांबच लांब वाढत जाते. साखर, गुळ किंवा कोणत्याही  गोड पदार्थांच्या डब्यात हमखास मुंग्या लागतात. अशावेळी पदार्थ फेकून देण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. (How to get rid of ants in the kitchen)

इतकंच नाही तर रोज चपाती, भाकरीच्या डब्यालाही मुंग्या लागतात. तर कधी बेसिन, बाथरूमच्या कोपऱ्यात रांगा दिसतात. पावसाच्या दिवसात कपडे व्यवस्थित बघून घातले नाहीत तर मुंग्या कपड्यांवर चिकटतात आणि नकळत त्वचेवर खाज, पुरळ येते. अशावेळी मुंग्या पळवून कसं लावायचं असा प्रश्न पडतो. मुंग्यांना पळवण्यासाठी सोपे उपाय करून तुम्ही हा त्रास कायमचा दूर करू शकता. (How to Get Rid of Ants in the Kitchen)

मीठ

ज्या ठिकाणी मुंग्या येतात तिथे मीठ  किवा मीठाचं पाणी शिंपडा. हा मुंग्या घालवण्याचा नैसर्गिक उपाय आहे. यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. हवंतर तुम्ही  मीठ पाण्यात उकळवून ते लिक्विड बॉटलमध्ये भरूनही स्प्रे करू शकता. 

लिंबू

लिंबू आणि वापरलेल्या लिंबाच्या सालीचा वापर करून तुम्ही मुंग्यांना घराबाहेर घालवू शकता. यासाठी लादी पुसताना पाण्यात लिंबाचा रस पिळून घाला. लिंबाच्या  वासानं मुंग्या दूर राहतील. लिंबाची सालं तुम्ही घराच्या कोपऱ्यांमध्येही ठेवू शकता. 

व्हाईट व्हिनेगर

व्हाईट व्हिनेगर स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि त्यात पाणी घालून मिक्स करा. जिथे मुंग्या येतील तिथे व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा. व्हिनेगरच्या  वासानं मुंग्या दूर पळतील.

काळी मिरी

मुंग्यांना गोड पदार्थ आवडतात. म्हणून त्या त्यांच्या शोधात कुठेही येतात. साखरेच्या डब्यात काळीमिरी ठेवा. किंवा ज्या ठिकाणी मुंग्या जास्त येतात असं तुम्हाला वाटत असेल तिथे काळी मिरी पूड शिंपडा.

१) मुंग्या तयार होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण गोड पदार्थ आहेत.  झाकण न लावता कोणताही गोड पदार्थ ठेवू नका.

२) दालचिनी आणि लवंग गोड पदार्थांजवळ ठेवा जेणेकरून मुंग्या दूर  राहतील.

३) फरशीवर फिरणाऱ्या मुंग्यांना पळवण्यासाठी लिंबाचा रस आणि पाण्याचा स्प्रे शिंपडा.

४) इसेंशियल ऑईल शिंपडल्यानेही मुंग्या दूर जातील.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स