Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात स्वयंपाकघरात कुबट वास येतो -घरभर दुर्गंधी? ४ टिप्स, किचनमध्ये वाटेल फ्रेश

पावसाळ्यात स्वयंपाकघरात कुबट वास येतो -घरभर दुर्गंधी? ४ टिप्स, किचनमध्ये वाटेल फ्रेश

How To Get Rid From Bad Smell From Kitchen : हा कुबट वास नेमका कशाने येतो हेही आपल्याला समजत नाही, तो घालवण्याचे सोपे उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 01:01 PM2023-07-07T13:01:58+5:302023-08-02T10:18:53+5:30

How To Get Rid From Bad Smell From Kitchen : हा कुबट वास नेमका कशाने येतो हेही आपल्याला समजत नाही, तो घालवण्याचे सोपे उपाय..

How To Get Rid From Bad Smell From Kitchen : There is a constant musty smell in the kitchen; 4 Tips - Feel very fresh | पावसाळ्यात स्वयंपाकघरात कुबट वास येतो -घरभर दुर्गंधी? ४ टिप्स, किचनमध्ये वाटेल फ्रेश

पावसाळ्यात स्वयंपाकघरात कुबट वास येतो -घरभर दुर्गंधी? ४ टिप्स, किचनमध्ये वाटेल फ्रेश

किचन म्हणजे आपल्या घरातील अतिशय महत्त्वाची जागा. सगळ्यांच्या आवडी निवडी जपणारी. सकाळी उठल्यावर अगदी चहापासून ते रात्रीच्या हळद-दुधापर्यंत आपल्याला देणारी जागा म्हणजे कीचन. याठिकाणी असणारे फ्रिज, मायक्रोव्हेव, मिक्सर, गॅस, भांडी या सगळ्याच गोष्टी स्वयंपाकासाठी अतिशय गरजेच्या. घरातील सर्वात जास्त वापरली जाणारी जागाही तितकीच स्वच्छ आणि सुंदर असावी असं आपल्याला वाटतं. म्हणून आपण किचनमध्ये स्वयंपाक करुन झाला की ती घासून, पुसून साफ करतो. मात्र पावसाळ्याच्या दरम्यान ओलावा असल्याने हा वास जास्तच येतो (How To Get Rid From Bad Smell From Kitchen).  

किचनमधील सिंक, ट्रॉलिज, कपाटं, ओट्याच्या मागच्या टाइल्स, इलेक्र्टॉनिक उपकरणं हे सगळं सतत स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो. मात्र तरी याठिकाणी कधी ना कधी झुरळं, मुंग्या होतातच. इतकंच नाही तर अनेकदा या किचनमध्ये कुबट वासही येतो. स्वयंपाकाच्या ठिकाणी किंवा जेवणाच्या ठिकाणी असा वास आला की अगदी नको वाटते. किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन किंवा चांगली खेळती हवा असेल तर ठिक. पण तसे नसेल तर हा वास किचनमध्येच फिरत राहतो. कितीही साफसफाई केली तरी हा वास काही कमी होत नाही. हा कुबट वास नेमका कशाने येतो हेही आपल्याला समजत नाही. हा वास येऊ नये म्हणून काय करावं याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. चॉपिंग बोर्ड करा साफ 

काही वेळा आपण घाईघाईत चॉपिंग बोर्डवर भाज्या, कांदा, लसूण असं काही ना काही कापतो आणि ते वापरल्यानंतर हा चॉपिंग बोर्ड तसाच ठेवतो. चॉपिंग बोर्ड धुवायचा विसरला तर त्याला एकप्रकारचा वास येतो आणि हा कुबट वास थोड्या वेळाने घरभर पसरतो. त्यामुळे चॉपिंग बोर्डचे काम झाल्या झाल्या तो साफ करुन ठेवायला हवा. 

२. कचरा ठेवू नका 

अनेकदा स्वयंपाकघरातील खरकटे टाकण्यासाठी आपण सिंकच्या जवळ एक छोटासा डबा किंवा पिशवी ठेवतो. यामध्ये आपण फळं-भाज्यांच्या सालीपासून ते चहाचा चोथा किंवा खरकटे असे सगळेच टाकत राहतो. स्वच्छतेच्या दृष्टीने हे बरोबर असले तरी या पिशवीतील अन्नातून काही वेळाने एकप्रकारचा कुबट वास येतो आणि तो किचनभर पसरतो. मग किचनच कुबट वाटायला लागते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. भांडी पुसायचे आणि ओटा पुसायचे कापड

आपण किचनमध्ये एक नॅपकीन ठेवतो जो आपल्याला भांडी पुसायला किंवा हात पुसायला लागतो. तसेच ओटा साफ करण्यासाठीही आपल्या सिंकवर एक फडके असते. ओट्यावर सांडलेले पीठ किंवा आणखी काही गोष्टी पुसण्यासाठी आपण या फडक्याचा वापर करतो. ही दोन्ही फडकी बहुतांशवेळा ओलसर असतात. ती नीट सुकवली नाहीत आणि न धुता बरेच दिवस तशीच वापरत राहिलो तर त्याचा वास यायला लागतो आणि तो सगळीकडे पसरतो. 

 दालचिनी हा मसाल्याच्या पदार्थांमधील एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. याचा स्वाद फार छान असल्याने आपण विविध पदार्थांमध्ये ती वापरतो. दालचिनीचे लहान तुकडे गरम पाण्यात उकळून ते पाणी स्वयंपाक घरात ठेवल्यास घरातला कुबट वास जाऊन चांगला वास येण्यास मदत होते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करुन पाहा. 

Web Title: How To Get Rid From Bad Smell From Kitchen : There is a constant musty smell in the kitchen; 4 Tips - Feel very fresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.