घराची कितीही स्वच्छता करा तरी ही झुरळं काही केल्या हलायचं नाव घेत नाहीत. एकदा सुरुवात झाली की संपूर्ण किचनचा ताबा घेऊन ते आपली प्रजाती जास्तीत जास्त कशी वाढवता येईल याचाच प्रयत्न करत राहतात. सतत स्वच्छता केली तरी सिंकच्या आजुबाजूला, ट्रॉलीमध्ये, भांड्यांवर आणि काही वेळा पदार्थांवरही ही झुरळं सर्रास फिरत असतात. कधी आपण एखादी वस्तू काढायला जातो आणि ७-८ झुरळांची एकदम धावाधाव सुरू होते. मग आपण कधी घरगुती उपायांनी तर कधी पेस्ट कंट्रोल करुन ही झुरळं पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामुळे काही वेळासाठी ही झुरळं गायब होतात आणि थोडे दिवसांनी पुन्हा दिसायला लागतात (How To Get Rid from Cockroaches home Remedy) .
उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांत दमट हवामानामुळे त्यांचा घरातील वावर आणखीनच वाढतो. आता झुरळांची किळस वाटते, त्यांच्यामुळे त्रास होतो हे सगळे ठिक आहे पण झुरळांच्या किचनमधील सततच्या वावराने आपल्या आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. झुरळांच्या भांड्यांमधील अन्न खाल्ल्याने आपल्याला काही समस्या उद्भवू शकतात. खायच्या पदार्थांवर, भांड्यामध्ये फिरणारी झुरळं पाहून आपल्याला किळस तर येतेच पण त्यापेक्षाही अशाप्रकारे खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर झुरळांचा वावर आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो. अॅलर्जी, इन्फेक्शन, पोट बिघडणे यांसारख्या समस्या यांमुळे उद्भवू शकतात. म्हणूनच झुरळं घालवण्याचा १ सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत.
उपाय काय?
१ मोठा चमचा गव्हाचे पीठ आणि १ लहान चमचा बोरीक पावडर घ्यायची. आपण ज्याप्रमाणे पोळ्यांसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे पाणी घालून हे पीठ चांगले मळून घ्यायचे. कणकेचा गोळा तयार झाला की त्याचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करुन घरात ज्या कोपऱ्यांमध्ये झुरळं येतात त्याठिकाणी हे गोळे ठेवायचे. काही वेळातच हे गोळे कडक होतात आणि यामुळे झुरळं पळवून लावण्यास मदत होते. दर ४ महिन्यांनी ही प्रक्रिया केल्यास घरात ठाण मांडून बसलेली झुरळं निघून जाण्यास निश्चितच मदत होते.