Join us

किचन ट्रॉलीमध्ये झुरळांचा सुळसुळाट ? ४ टिप्स, महागडे स्प्रे - गोळ्यांचा वापर न करता झुरळं होतील गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2025 13:18 IST

How To Get Rid from Cockroaches home Remedy : 4 Effective Home Remedies to Keep Cockroaches Away : 4 Amazing Home Remedies for Cockroaches : Hack to keep cockroaches away : किचन ट्रॉलीमधील झुरळांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी खालील ४ टिप्स ठरतील असरदार...

आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या किचनमध्ये झुरळांचा कायम सुळसुळाट असतो. किचनमधील झुरळांचा असा धुमाकूळ पाहून अनेक गृहिणींना किचनमध्ये काम करणे म्हणजे नकोसेच वाटते. काहीवेळा किचनची योग्य पद्धतीने सफाई करुन देखील वारंवार किचनमध्ये झुरळं होतात. किचनमधील झुरळांचे वाढते प्रमाण पाहून आपल्याला नेमका काय उपाय ( 4 Effective Home Remedies to Keep Cockroaches Away) करावा हे सुचत नाही. ही झुरळं किचनमध्ये सर्वत्र मोकाट (How To Get Rid from Cockroaches home Remedy) फिरत असतात. किचन ओटा, भांडी ठेवण्याचे ड्रॉव्हर, लहान मोठ्या बरण्या अशा किचनमधील अनेक वस्तूंवर ही झुरळं अगदी बिंधास्त फिरत असतात. परंतु जेव्हा किचन ड्रॉव्हरमध्ये ठेवलेल्या भांड्यांवर अशी झुरळं फिरतात तेव्हा किळसवाणे वाटते( Hack to keep cockroaches away).

काहीवेळा तर ही झुरळांची लहान पिल्लं वाट्या, चमचे, डबे यात जाऊन बसतात, अशावेळी ड्रॉव्हर मधील प्रत्येक भांड  वापरण्याआधी स्वच्छ धुवून घ्यावे लागते. बरं, यावर उपाय म्हणून आपण अनेक महागडे स्प्रे, डांबराच्या गोळ्या किंवा इतर उपाय करतो. परंत्तू काहीवेळा असे अनेक उपाय करूनही किचन ड्रॉव्हर, कपाटांमधील झुरळांची संख्या कमी होतच नाही. यासाठी, किचन ड्रॉव्हरमधील झुरळांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी आपण खालील ४ टिप्सचा वापर करु शकतो. या सोप्या ४ टिप्स फॉलो केल्याने आपल्या किचनमधील झुरळांचे वाढते प्रमाण कमी होऊ शकते( 4 Amazing Home Remedies for Cockroaches).

किचन ड्रॉव्हरमधील झुरळांचे प्रमाण कमी करण्यासाठी... 

mommywithatwist या इंस्टाग्राम अकाऊंटवरून किचन ट्रॉलीमधील भांड्यांवर मोकाट फिरणाऱ्या झुरळांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणत्या ४ टिप्स उपयोगी येतील याबद्दल अधिक माहिती दिली आहे. या ४ टिप्स कोणत्या ते पाहूयात. 

१. किचन ड्रॉव्हर मधील भांडी स्वच्छ पुसून ठेवावी :- किचन ड्रॉव्हरमध्ये धुतलेली ओली भांडी ठेवताना ती व्यवस्थितपणे सुकली आहेत याची खात्री करावी. किचन ड्रॉव्हर मध्ये शक्यतो धुतलेली ओली भांडी ठेवू नयेत. ओली भांडी स्वच्छ पुसून आधी कोरडी करुन मगच ठेवावी. ओलेपणामुळे ड्रॉव्हर तर खराब होऊ शकतात सोबतच ओलाव्याने झुरळांचे प्रमाण देखील वाढू शकते. यासाठी किचन ड्रॉव्हर मध्ये भांडी ठेवताना ती स्वच्छ पुसून मगच ठेवावी. 

पेट्रोलियम जेली फक्त ओठांनाच लावता? घरातली ‘ही’ कामंही जेलीनं होतील फटाफट...

२. व्हाईट व्हिनेगर :- आठवड्यातून किमान एकदा तरी ड्रॉव्हर व्हाईट व्हिनेगरच्या मदतीने स्वच्छ पुसून घ्यावा. व्हाईट व्हिनेगर वापरल्याने झुरळांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. यासाठी एका स्वच्छ सुती कापडावर व्हिनेगर ओतून या कापडाने ड्रॉव्हर स्वच्छ पुसून घ्यावा. व्हाईट व्हिनेगरच्या उग्र वासामुळे झुरळांचे प्रमाण कमी होते. 

पाणी पिण्यासाठी तांब्याची बाटली वापरावी की स्टीलची? दिवसभर कोणतं पाणी पिणं जास्त फायद्याचं...

३. तमालपत्राचा वापर :- ड्रॉव्हर स्वच्छ पुसून झाल्यानंतर त्यात ३ ते ४ तमालपत्रांची पाने ठेवावीत. तमालपत्रांच्या उग्र वासाने झुरळं त्याचा जवळपास देखील फिरकत नाहीत. यासाठी तमालपत्रांचा असा वापर करावा. 

घासणी किंवा चमच्याने खरवडण्याची गरज नाही, कुकरच्या तळाशी करपून चिकटलेला भात निघेल सहज - भन्नाट ट्रिक...

४. ड्रॉव्हरमध्ये वर्तमानपत्राचा वापर करु नये :- बरेचजण किचन ट्रॉलीमध्ये तळाशी वर्तमानपत्र अंथरून ठेवतात. अशी चूक करु नये. शक्यतो किचन ट्रॉलीमध्ये वर्तमानपत्राचा वापर करु नये.

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्सहोम रेमेडी