Lokmat Sakhi >Social Viral > किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झालाय? ५ सोपे उपाय, घरात एकही झुरळ दिसणार नाही

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झालाय? ५ सोपे उपाय, घरात एकही झुरळ दिसणार नाही

How to Get Rid From Cockroaches : केमिकल्सयुक्त स्प्रे न वापरता घरगुती उपायांनी तुम्ही झुरळांना लांब ठेवू शकता.  (How to get rid from cockroaches)

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 09:24 AM2023-08-23T09:24:00+5:302023-08-23T16:18:27+5:30

How to Get Rid From Cockroaches : केमिकल्सयुक्त स्प्रे न वापरता घरगुती उपायांनी तुम्ही झुरळांना लांब ठेवू शकता.  (How to get rid from cockroaches)

How to Get Rid From Cockroaches : How to Get Rid of Cockroaches Using Home Remedies | किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झालाय? ५ सोपे उपाय, घरात एकही झुरळ दिसणार नाही

किचनमध्ये बारीक झुरळांचा सुळसुळाट झालाय? ५ सोपे उपाय, घरात एकही झुरळ दिसणार नाही

घरातल्या झुरळांना पळवून लावणं म्हणजे कठीण काम. स्प्रे मारल्यानंतर तेव्हढ्या पुरताच हे झुरळं कमी होतात नंतर पुन्हा दिसू लागतात. खरकटं किंवा उष्टे अन्नपदार्थ पडलेले दिसले की पुन्हा बारीक झुरळं व्हायला सुरूवात होते. झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी उत्तम घरगुती वस्तूंचे पर्याय आहेत. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला कसलाच खर्च करावा लागणार नाही. केमिकल्सयुक्त स्प्रे न आणता घरगुती उपायांनी तुम्ही झुरळांना लांब ठेवू शकता.  (How to get rid from cockroaches)

झुरळांना पळवून लावण्यासाठी सगळ्यात आधी  एका भांड्यात व्हिनेगर घ्या त्यात लवंग घाला. मग त्यात लिंबाचे साल घाला. नंतर यात अल्कोहोल असलेले हॅण्ड सॅनिटायझर घाला. (Effective Ways to Get Rid of Cockroaches) व्यवस्थित ढवळून हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. बॉटलमधील हे द्रावण अशा ठिकाणी फवारा जिथे जास्त प्रमाणात कॉकरॉच येतात. (How to Get Rid of Cockroaches From Your Home Remedies)

बोरीक पावडर

बोरीक पावडर तुम्हाला सहज उपलब्ध होईल. बोरीक पावडरच्या लहान लहान गोळ्या तयार करा आणि स्वंयपाकघरात जिथे कॉकरॉच येतात तिथे या गोळ्या ठेवा. या गोळ्यांमुळे कॉकरॉच गायब होण्यास मदत होईल. महिनाभरात किंवा २० दिवसातून २ वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. जेणेकरून झुरळ स्वंयपाकघरात येणार नाहीत.

तेजपत्ता

तमालपत्र स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी वापरलं जातं. घरातून झुरळांना पळवून लावण्यासाठी झुरळं फायदेशीर ठरतात.  त्यासाठी सगळ्यात आधी तमालपत्राचा चुरा बनवा. मग घराच्या अशा कोपऱ्यावर हा चुरा ठेवा जिथे झुरळं जास्त येतात. याच्या तीव्र वासाने झुरळं दूर पळतील. 

बेकींग सोडा

बेकींग सोडा कोणच्याही स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध होतो.  एक कप पाण्यात बेकींग सोडा  आणि साखर मिसळून मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा. साखरेचा सुगंध  झुरळांना आकर्षिक करतो. याऊलट बेकींग सोडा झुरळांसाठी विषाप्रमाणे काम करतो.  याच्या वासानं झुरळं जागच्याजागी मरतात आणि पुन्हा घरातही शिरत नाही.

लवंग

लवंगाचा रंग झुरळांसारखाच असतो पण झुरळं कायमचे घालवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरतात. झुरळं कुठेही फिरत असतील तरी लवंग आसपासही येत नाहीत. तुम्ही स्वंयपाकघरात, बाल्कनी, ड्रॉवरमध्ये कुठेही लवंग ठेवू शकता. 

रॉकेल

जर घरात रॉकेल असेल तर याचे काही थेंब कापसाच्या बोळ्याला लावून तुम्ही घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता. स्वयंपाकघरापर्यंत रॉकेल पोहोचणार नाही याची काळजी घ्या. कपाटात,बाल्कनीत तुम्ही रॉकेलमध्ये बुडवलेले कापसाचे बोळे ठेवू शकता. 

Web Title: How to Get Rid From Cockroaches : How to Get Rid of Cockroaches Using Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.