Lokmat Sakhi >Social Viral > किचनमध्ये छोट्या पाली फार झाल्या? ३ वस्तू घराच्या कोपऱ्यात ठेवा, २ मिनिटांत पाली गायब

किचनमध्ये छोट्या पाली फार झाल्या? ३ वस्तू घराच्या कोपऱ्यात ठेवा, २ मिनिटांत पाली गायब

How To Get Rid From lizards : एक पाल आल्यानंतर घरात छोट्या छोट्या पाली तयार होत जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 01:35 PM2024-05-19T13:35:20+5:302024-05-20T16:26:27+5:30

How To Get Rid From lizards : एक पाल आल्यानंतर घरात छोट्या छोट्या पाली तयार होत जातात.

How To Get Rid From lizards : How to Get Rid Lizards Around the House | किचनमध्ये छोट्या पाली फार झाल्या? ३ वस्तू घराच्या कोपऱ्यात ठेवा, २ मिनिटांत पाली गायब

किचनमध्ये छोट्या पाली फार झाल्या? ३ वस्तू घराच्या कोपऱ्यात ठेवा, २ मिनिटांत पाली गायब

प्रत्येकाच्याच घरात पाली असतात. (Home Hacks) पाली घरातील किटकांना खाण्यास मदत करतात. घरात अन्नाचे कण पडले असती तर झुरळांबरोबरच पालीसुद्धा फिरायला सुरूवात होते. घरांत पाली शिरल्यानंतर कटकट असा आवाज येतो.  काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही पालींना दूर पळवू शकता. (How To Get Rid From lizards)खिडक्यांमधून किंवा दरवाज्याच्या फटीतून पाली घरात येतात. एक पाल आल्यानंतर घरात छोट्या छोट्या पाली तयार होत जातात. पालींना घरातून दूर पळवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How to Get Rid Lizards Around the House)

१) काळ्या मिरीचा स्प्रे

काळ्या मिरीचे पाणी पालींना दूर पळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. काळ्या मिरचीचा स्प्रे शरीरात जळजळ निर्माण होण्यापासून रोखतो. म्हणून घराच्या प्रत्येक  कोपऱ्यांमध्ये काळ्या मिरीचा स्प्रे नक्की करा. या उपायाने तुम्ही पालींना दूर पळवू शकतात.

२) नेप्थलीनच्या गोळ्या

नेफ्थलीन बॉल्सचा वापर  करून तुम्ही कपड्यांवरची छोटे किटक काढून टाकू शकता. या उपायाच्या मदतीने  पाली घरापासून दूर होण्यास मदत होईल. जर तुम्हाला पाली आवडत नसतील तर तुम्ही घराच्या कोपऱ्यांवर ठेवू शकता ज्यामुळे पाली घरातून दूर पळण्यास मदत होईल. 

मुलांनी अभ्यासाला कधी बसावं? विकास दिव्यकिर्ती सांगतात,अभ्यासाची योग्य वेळ-हुशार होतील मुलं

३) कांदा आणि लसूण

कांदा आणि लसणाचा सुगंध खूपच तीव्र असतो जो पालींना अजिबात आवडत नाही. तुम्ही हे तुकडे घराच्या कोपऱ्याववर ठेवू शकता.  याचा रस काढून  घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रे करा. ज्यामुळे पाली आसपास भटकणार नाहीत.  कांद्याचा रस काढून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा नंतर हा स्प्रे पाली असलेल्या ठिकाणी लावा. ज्यामुळे पाली घरात शिरणार नाहीत. 

१) नेफ्थलीन बॉल्समुळे  पाली घरात येण्यापासून रोखता येते. किचनमधील कपाट, स्टोरेज रॅक आणि सिंकच्या खाली तुम्ही हे ठेवू शकता. फक्त  घरातील अन्न धान्य स्टोरेजपासून हे बॉल्स वेगळे ठेवा. 

पाळीचा खूप त्रास होतो, अनियमित येते? चहात 'हा' पदार्थ मिसळून प्या- डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय

२) घरात खरकटं उष्ट अन्न पडलेलं नसेल याची काळजी घ्या. कारण खरकट्या उष्ट्या अन्नामुळे जास्तीत जास्त किटक, पाली घरात तयार होण्याची शक्यता असते. नियमित किचन कॅबिनेट स्वच्छ करा. कचऱ्याचे डबे व्यवस्थित धुवून घ्या. ज्यामुळे पाली घरापासून दूर होण्यास मदत  होईल. 

Web Title: How To Get Rid From lizards : How to Get Rid Lizards Around the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.