ऊन्हाळ्याच्या दिवसांत मुंग्यांच्या रांगाच रांगा लागतात. किचनमध्ये काहीही गोड पदार्थ पडला असेल किंवा कोणताही अन्नाचा कण असेल तर मुंग्यांची लांबचलांब रांग लागते. (Kitchen Hacks) मुंग्या अंगाला चावल्या किंवा कपड्यांमध्ये शिरल्या तर त्वचेवर खूपच इरीटेशन होते. (Effective Methods To Get Rid Of Ants Naturally) मुंग्या होऊ नयेत यासाठी वेळीच काही उपाय केले तर हा त्रास टाळता येऊ शकतो. काही सोपे हॅक्स तुमचं काम सोपं करतील. मुंग्या दूर ठेवण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. (How to Get Rid Of Ants)
1) बोरेक्स पावडर आणि साखर
हा उपाय करण्यासााठी १ कप पाण्यात, १ चमचा बोरेक्स पावडर, २ चमचे साखर घालून व्यवस्थित एकजीव करा. एक कॉटल बॉल पाण्यात घालून ठेवा. कॉटन बॉल एका प्लेटमध्ये ठेवा १ ते २ साखर चमचे साखर बोरेक्स पावडरमध्ये पाणी घाला. ही प्लेट जिथे ठेवाल तिथे मुंग्या अजिबात येणार नाहीत. ही पद्धत मुंग्यांना दूर घालवण्यासाठी परफेक्ट आहे.
2) साबणाचे पाणी
मुंग्यापासून सुटका मिळवण्यासाठी साबणाचे पाणी तुम्ही वापरू शकता. हा उपाय केल्याने स्वंयपाकघरातील मुंग्या पळून जाण्यास मदत होईल. फक्त पाणी आणि साबणाची पेस्ट तयार करावी लागेल. सगळ्यात आधी कपडे पाण्यात भिजवून घ्या. त्यानंतर फूड कंटेनर आणि किचन काऊंटर ओल्या कापडाने पुसून घ्या. साबणाच्या पाण्याच्या वापराने मुंग्या पळून जाण्यास मदत होईल.
ओटी पोट लटकतंय-मागून फिगर जाड दिसते? सकाळी उपाशी पोटी 'हा' पदार्थ घ्या-स्लिम व्हाल
३) मुंग्याना पळवून लावण्यासाठी हळदीचा वापर कसा करावा?
किचनमध्ये लाल मुंग्या झाल्या असतील तर त्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. हळदीत काही प्राकृतीक गुण असतात ज्यामुळे मुंग्या पळून जाण्यास मदत होते.
५) व्हिनेगर
जर किचनमध्ये लाल मुंग्या झाल्या असतीर तर मुंग्यांना पळवण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. हा उपाय करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर आणि पाणी घाला नंतर ही पेस्ट एखाद्या ठिकाणी शिंपडा ज्यामुळे मुंग्या निघून जाण्यास मदत होईल.
सतत थकवा-हाडं पोकळ-खिळखिळी? -कारण व्हिटामीन B-12 ची कमतरता; ५ पदार्थ खा, व्हा स्ट्रॉँग
६) किचन नियमित स्वच्छ करा
किचनमध्ये मुंग्या होऊ नयेत यासाठी नियमत साफसफाई करणं फार महत्वाचे आहे. फक्त किचन स्लॅबच नाही तर किचनमध्ये ठेवलेलं प्रत्येक सामानही स्वच्छ करा. सिंकमध्ये पॅन आणि इतर भांडी जमा होऊ देऊ नका. किचनमध्ये उष्टी भांडी ठेवू नका. ही भांडी लगेचच फ्रिजर किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. असं केल्यानं किचन साफ आणि स्वच्छ राहण्यास मदत होईल.