Join us  

घरभर लाल मुंग्यांच्या रांगा? करा चिमूटभर कापराचा सोपा उपाय- मुंग्या मिनिटांत गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 4:21 PM

How To Get Rid Of Ants: one camphor home remedy for Ants : लालभडक मुंग्यांना घालवण्याची सोपी ट्रिक!

घरातील गुळ-साखर किंवा गोड पदार्थ असलेल्या डब्याजवळ लाल मुंग्या हमखास येतात (Ants). उन्हाळ्याच्या दिवसात घरात लाल मुंग्यांचे प्रमाण वाढताना आपण पाहिलं असेल (Cleaning Tips). लाल मुंग्यांना पाहिलं की, आपल्या अंगावर काटे येतात. किचनमधील सिंकच्या आजाबाजूला, ओट्यावर या मुंग्यांची रांग लागलेली दिसते. काहीवेळी या मुंग्या अगदी बारीक असतात तर काहीवेळा मोठ्या लाल चावणाऱ्या मुंग्या असतात.

मुंग्यांना घालवण्यासाठी आपण बरेच जण, रसायनयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करतो. यामुळे मुंग्या गायब होतात, पण केमिकेल रसायनयुक्त प्रॉडक्ट्समुळे आरोग्याला हानी पोहचू शकते. जर आपल्याला मुंग्यांपासून सुटका हवी असेल तर, आपण कापराचा वापर करून पाहू शकता. कापराच्या वापराने काही मिनिटात मुंग्या गायब होतील(How To Get Rid Of Ants: one camphor home remedy for Ants).

मिनिटात मुंग्या घालवण्यासाठी घरगुती टिप्स(How to get rid of Ants)

लागणारं साहित्य

कापूर

बोरिक ऍसिड पावडर

उन्हाळ्यात डोळे चुरचुरतात, लाल होतात? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचा सल्ला, ५ गोष्टी न चुकता करा..

डेटॉल एंटीसेप्टिक लिक्विड

अशा प्रकारे करा कापराचा वापर..

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक चमचा कापराची पावडर घ्या. त्यात ४ चमचे पाणी घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा बोरिक ऍसिड पावडर आणि अर्धा चमचा डेटॉल एंटीसेप्टिक लिक्विड घालून मिक्स करा.

आता तयार लिक्विड एका स्प्रे बॉटलमध्ये भरा, आणि ज्या ठिकाणी मुंग्यांची रांग दिसत असेल तेथे स्प्रे करा. काही मिनिटात त्या जागेवरून मुंग्या गायब होतील. 

जर आपण फरशी पुसत असाल तर, आपण बादलीतल्या पाण्यात लिक्विड मिसळून फरशी पुसू शकता. यामुळे लादी चकाचक दिसेल. शिवाय काही मिनिटात त्यावरील किटाणू आणि मुंग्या गायब होतील.

लिंबाचा रस आणि पाणी

१ कप सोया चंक्सचे करा इन्स्टंट आप्पे, १० मिनिटांत चमचमीत खायचे तर हवेत सोयाबिन आप्पे

लिंबाच्या रसाच्या वापरानेही आपण मुंग्यांना घालवू शकता. यासाठी एका लिंबाच्या रसामध्ये तीन कप पाणी मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. आता हे तयार लिक्विड मुंग्यांची रांग दिसेल त्या ठिकाणी स्प्रे करा. काही मिनिटात मुंग्या गायब होतील.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स