बाथरूम ही अशी जागा असते जी सतत ओलसर राहते. ओलसरपणामुळे बऱ्याचदा बाथरूममधून कुबट वास येतो. शिवाय बाथरुमचे दारही सतत बंद ठेवले जाते. त्यामुळे खिडकीतून येईल एवढाच सुर्यप्रकाश त्या जागेला मिळतो. त्यामुळे बऱ्याचदा नियमितपणे घासूनही बाथरुम स्वच्छ, फ्रेश वाटत नाही (How to get rid of bad or fishy odour from the bathroom?). तुमच्याही बाथरुमच्या बाबतीत असेच होत असेल, तर हे काही उपाय करून बघा. या उपायांमुळे बाथरुम नेहमीच सुगंधी राहील आणि तिथला कुबटपणा जाऊन स्वच्छ, फ्रेश वाटेल.( How to keep your bathroom or washroom clean and fresh?)
बाथरूम मधील कुबटपणा घालवण्यासाठी टिप्स
१. बेकिंग सोडा आणि कपूरचा वापर
तीन टेबलस्पून बेकिंग सोडा, दोन टेबलस्पून कापुराची पावडर एकत्र करा. त्यामध्ये इसेंशियल ऑईलचे चार ते पाच थेंब टाका.
भोपळ्याचे करा खमंग अप्पे, भोपळ्याची नावडती भाजीही होईल आवडती, मुलांच्या डब्यासाठी चविष्ट पदार्थ
एक टेबलस्पून जॉन्सन बेबी ऑइल टाका. आणि चार ते पाच लवंगा टाकून हे मिश्रण व्यवस्थित हलवा आणि बाथरूम मध्ये एका कोपऱ्यात ठेवून द्या. फ्रेश वाटेल.
२. मनी प्लांट किंवा स्नेक प्लांट
मनी प्लांट किंवा स्नेक प्लांटची एखादी लहानशी कुंडी बाथरूमच्या खिडकीत ठेवून द्या.
साेनम कपूरच्या एक वर्षाच्या बाळाच्या बुटांची किंमत ४२०००! एवढे महाग, त्यात असं खास काय?
या झाडांना खूप सुर्यप्रकाशाची गरज नसते. या झाडांमुळे कुबटपणा शोषला जाऊन फ्रेश वाटण्यास मदत होईल.
३. पायपुसणे कसे आहे
बाथरूम मध्ये किंवा बाथरूमच्या आसपास जाडसर, फर असणारे पाय पुसणे ठेवू नका. ते बदलून तिथे पातळ, प्लास्टिकचे पाय पुसणे ठेवा. बऱ्याचदा पायपुसणे नेहमीच ओलसर राहते आणि मग त्यातून वास येऊ लागतो.
४. व्हिनेगर
बाथरूमच्या कोपऱ्यांमध्ये थोडे थोडे व्हिनेगर शिंपडू ठेवा. यामुळेही दुर्गंध, कुबटपणा जाण्यास मदत होते.
५. एसेंशियल ऑईल
कापसाचा एक बोळा घ्या. तो एसेंशियल ऑईलमध्ये बुडवा आणि बाथरुमच्या खिडकीमध्ये, बाथरुममधील डस्टबीनमध्ये ठेवून द्या.