Join us

तांदळात किडे झाले? 'हा' पांढरा पदार्थ डब्यात घालून ठेवा- सगळे किडे आपोआप येतील बाहेर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2025 16:17 IST

How to get rid of bugs from rice: तांदळामध्ये जर किडे झाले असतील तर हा एक अतिशय सोपा उपाय लगेचच करून पाहा..(simple tips and tricks to remove bugs from rice)

ठळक मुद्देकाही वेळातच किडे तांदळाच्यावर येऊन डब्याबाहेर जाताना दिसतील. 

डाळ, तांदूळ किंवा इतर काही धान्य आपण दर महिन्याला खरेदी करत नाही. तीन ते चार महिन्यांसाठी लागणारं धान्य अनेक घरांमध्ये एकदाच भरलं जातं. काही काही घरांमध्ये तर वर्षभराचं धान्य एकदाच भरून साठवलं जातं. पण काही जणींना ते वर्षभर व्यवस्थित सांभाळणं जमतं तर काही घरात मात्र अगदी महिन्याभरातच तांदळात पोरकिडे दिसू लागतात. यावर जर वेळीच उपाय केले नाही तर मग सगळं धान्यच खराब होतं आणि पैशांचीही नासाडी होते (how to get rid of bugs from rice?). म्हणूनच तुमच्याही घरात जर डाळ- तांदुळामध्ये किडे झाले असतील तर हा एक अगदी सोपा उपाय लगेचच करून पाहा...(simple tips and tricks to remove bugs from rice)

 

डाळ- तांदुळात किडे झाले असतील तर काय उपाय करावा?

धान्यामध्ये झालेले किडे काढून टाकण्याचा हा एक सगळ्यात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ॲल्युमिनियम फॉईल आणि तुरटी लागणार आहे. 

सगळ्यात आधी ॲल्युमिनियम फॉईलचा एक छोटासा तुकडा घ्या. त्या तुकड्यावर एक तुरटी ठेवून ती ॲल्युमिनियम फॉईलने गुंडाळा.

'लकी' म्हणून घरी आणलेलं बांबू प्लांट काही दिवसांतच सुकतं- पानं पिवळी पडतात? ४ सोप्या टिप्स

असे ३ ते ४ गोळे करा आणि ते तुमच्या तांदळाच्या डब्यात थोड्या थोड्या अंतराने ठेवून द्या. यानंतर पुढे काही वेळ डब्याचं झाकण उघडं ठेवा. 

तुम्हाला पुढच्या काही वेळातच किडे तांदळाच्यावर येऊन डब्याबाहेर जाताना दिसतील. 

 

तांदळाला किडे लागू नये म्हणून उपाय 

तांदळाला किडे झाल्यास आपण वरील उपाय करून पाहू शकतो. पण जर आपण आधीच थोडी काळजी घेतली तर तांदळाला किडे लागण्याचा प्रश्नच येत नाही.

इडली- डोशाचं पीठ आंबविण्यासाठी वेळ लागतो? ६ टिप्स, ४- ५ तासांतच होईल मस्त फर्मेंटेशन

त्यासाठी जर तांदूळ भरतानाच तुम्ही त्यामध्ये थोडी कडुलिंबाची पाने, तेजपान, लवंग, काडेपेटीचा कागद टाकून ठेवला तर या पदार्थांच्या उग्र वासामुळे तांदळात किडे होत नाहीत. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलकिचन टिप्स