Lokmat Sakhi >Social Viral > मुंग्या-झुरळं कायमचे पळून जातील; लादी पुसताना ही ट्रिक वापरा, घर चकाचक- स्वच्छ कायमच

मुंग्या-झुरळं कायमचे पळून जातील; लादी पुसताना ही ट्रिक वापरा, घर चकाचक- स्वच्छ कायमच

How to Get Rid of Cockroaches, Ants From Your Home Remedies : किचन सिंकजवळ खरकटी भांडी ठेवली रात्रभरात भरपूर झुरळं येतात. घरात झुरळं झाली की साफ-सफाई करूनही ते कमी होत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 08:33 AM2023-06-01T08:33:00+5:302023-06-02T16:44:08+5:30

How to Get Rid of Cockroaches, Ants From Your Home Remedies : किचन सिंकजवळ खरकटी भांडी ठेवली रात्रभरात भरपूर झुरळं येतात. घरात झुरळं झाली की साफ-सफाई करूनही ते कमी होत नाहीत.

How to Get Rid of Cockroaches, Ants From Your Home Remedies : DIY Home Remedies For Cockroach Control | मुंग्या-झुरळं कायमचे पळून जातील; लादी पुसताना ही ट्रिक वापरा, घर चकाचक- स्वच्छ कायमच

मुंग्या-झुरळं कायमचे पळून जातील; लादी पुसताना ही ट्रिक वापरा, घर चकाचक- स्वच्छ कायमच

उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्याही अन्नपदार्थाला सहज मुंग्या लागतात. एकदा मुंग्या लागल्या की लांबच लांब रांगा तयार होतात. मुंग्या घालवण्यचा खडू किंवा पावडर लावल्यानंतर तात्पुरत्या नष्ट होतात. नंतर पुन्हा हीच समस्या जाणवते. (How to Get Rid of Cockroaches, Ants From Your Home Remedies)

किचन सिंकजवळ खरकटी भांडी ठेवली रात्रभरात भरपूर झुरळं येतात. घरात झुरळं झाली की साफ-सफाई करूनही ते कमी होत नाहीत. (DIY Home Remedies For Cockroach Control) झुरळांमुळे गंभीर आजारही पसरू शकतात. घरातील किटकांना दूर पळवण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रेचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How To Get Rid Of Insects In Your Home)

 

सगळ्यात आधी कडूलिंबाची पानं पाण्यात घालून उकळवून घ्या. हे पाणी उकळून अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा.  एका स्वच्छ रिकाम्या बरणीत  मीठ आणि कापूर घाला. यात डिशवॉश लिक्विड घालून कडूलिंबाचं पाणी घाला.  लादी पुसण्याच्या पाण्यात हे पाणी मिसळा आणि लादी पुसा. यामुळे फरशी चमकेल आणि झुरळं, मुंग्याही कायम घराबाहेर राहतील.

घरात मुंग्या येण्यामागे गोड पदार्थ हे एक मोठे कारण असते. अशा परिस्थितीत गोड पदार्थ उघड्यावर किंवा झाकण नसलेल्या डब्यात न ठेवण्याचा प्रयत्न करा. जिथे मुंग्या येतात तिथे दालचिनी आणि लवंगा घाला. या उपायानेही मुंग्या पळून जातात. जमिनीवर फिरणाऱ्या मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी, लिंबाचा रस आणि पाण्याचा स्प्रे शिंपडा. इसेंशियल ऑईल्स शिंपडल्यानंतरही मुंग्या पळून जातात.

मुंग्या घालवण्यासाठी तुम्हाला १ कप पाणी घ्यावे लागेल आणि त्यात १ चमचा बोरॅक्स पावडर आणि २ चमचे साखर घालावी लागेल. आता दोन्ही गोष्टी पाण्यात नीट मिसळा आणि पाण्यात एक कापसाचा गोळा टाका. यानंतर, कापसाचा गोळा एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्यात १ ते १ थेंब साखर आणि बोरॅक्स पावडर असलेले पाणी घाला. आता हे ताट जिथे ठेवाल तिथे सगळ्या मुंग्या ताटात येतील. ही पद्धत सर्व प्रकारच्या मुंग्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

कडुलिंबात कीटकनाशक गुणधर्म आहेत. झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी झुरळं लपलेल्या जागेवर कडुलिंब पावडर किंवा त्याचे तेल शिंपडा. यामुळे झुरळं कायमचे पळून जातील.

Web Title: How to Get Rid of Cockroaches, Ants From Your Home Remedies : DIY Home Remedies For Cockroach Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.