Join us  

घरात बारीक झुरळं खूप झाली? झुरळांना पळवण्याची १ अमेरिकन ट्रिक- १ मिनिटात झुरळं गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 2:50 PM

How To Get Rid Of Cockroaches : घरात साफसफाई करताना झुरळांना त्रासही उद्भवतो. झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही अमेरिकन उपाय करू शकता.

घर असो किंवा कोणतंही रेस्टाँरंट किचनमध्ये झुरळांची फौज दिसून येते. डस्बीन्सच्या खाली,  सिंकजवळ, कपाटात भरपूर झुरळं दिसून येतात.  झुरळांना बघताच भिती वाटू लागते. (How To Get Rid Of Cockroaches) झुरळं घाण पसरवण्याबरोबरच गंभीर आजारही पसरवतात याशिवाय घातक आजारांचा धोकाही वाढतो.म्हणूनच झुरळांचा लवकरात लवकर नायनाट करायला हवा. (Effective Ways To Get Rid Of Cockroaches At Homes)

घरात साफसफाई करताना झुरळांना त्रासही उद्भवतो. झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही अमेरिकन उपाय करू शकता. याच्या मदतीने फक्त झुरळं घराबाहेर पडणार नाहीत या समस्येचा सामना पुन्हा करावा लागणार नाही. 

1) बोरेक्स पावडर

घरात फिरणाऱ्या  झुरळांना पळवण्यासाठी तुम्ही बोरॅक्स पावडरचा वापर करू शकता. अमेरिकन लोक बोरेक्स पावडरचा वापर करून किटकांना घरापासून दूर ठेवतात.  सगळ्यात आधी १ लिटर पाण्यात ४ चमचे बोरेक्स पावडर घाला. ते व्यवस्थित मिसळून त्यात एक ते २ चमचे मीठ किंवा लिंबाचा रस घालून मिसळा. ५ मिनिटं हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवा.  ५ मिनिटांनंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून ज्या ठिकाणी झुरळं असतात तिथे स्प्रे मारा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय केल्यास झुरळं पळून  जातील.

2)  फॉगर्स

अमेरिकन लोक झुरळांना पळवून लावण्यासाठी रोच बच किंवा फॉगर्सचा वापर करता. याचा वापर करताना सावधगिरी बाळगायला हवी. कारण यात बम आणि फॉगर्समध्ये पायरेथ्रिन किंवा पायरेथ्रोडड, एरोसोल यांसारख्या हानीकारक केमिकल्स असतात.  याचा वापर करताना हातात ग्लोव्हज आणि तोंडाला मास्क लावायला विसरू नका. केमिकल्सचा वापर ढेकून आणि झुरळं असलेल्या ठिकाणी करा. 

3) सिलिका जेल

बॅग्स आणि फुटवेअर बरोबरच सिलिका जेलचं छोट पाकीट झुरळं पळवण्यासाठीसुद्धा फायदेशीर आहे. ही ट्रिक वापरल्याने सिलिका जेलचं पाकीट सहज तोडता येईल. ज्या ठिकाणी ढेकून  असतात तिथे हे जेल घाला.  घरात पाळीव प्राणी असतील तक या जेलपासून लांब राहतील  याची काळजी घ्या. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. 

4) ड्रायर शीट

ड्रायर शीटर घरात अनेक प्रकारे वापरली जाते. कपाटातील कपड्यांना स्मेल फ्री ठेवण्यासाठी तुम्ही कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये घालू शकता. कपड्यांमध्ये सेंटचा स्मेल येत राहील हा स्मेल झुरळांना सहज होत नाही. याच्या वापराने झुरळांना दूर पळवण्यास मदत होईल.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनकिचन टिप्स