Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात घरामध्ये झुरळांचा सुळसुळाट? ७ उपाय; एक झुरळ घरात दिसणार नाही

पावसाळ्यात घरामध्ये झुरळांचा सुळसुळाट? ७ उपाय; एक झुरळ घरात दिसणार नाही

How to Get Rid of Cockroaches From Home : काही सोप्या टिप्सनी तुम्ही झुरळांना दूर पळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 03:56 PM2023-07-04T15:56:28+5:302023-07-04T18:27:22+5:30

How to Get Rid of Cockroaches From Home : काही सोप्या टिप्सनी तुम्ही झुरळांना दूर पळवू शकता.

How to Get Rid of Cockroaches From Home : How to Get Rid of Cockroaches From Your Home Remedies | पावसाळ्यात घरामध्ये झुरळांचा सुळसुळाट? ७ उपाय; एक झुरळ घरात दिसणार नाही

पावसाळ्यात घरामध्ये झुरळांचा सुळसुळाट? ७ उपाय; एक झुरळ घरात दिसणार नाही

पावसाळ्याच्या ऋतूत किटक-अळ्या दिसायला सुरूवात होते. स्वंयपाकघरात झुरळांचा वावर वाढल्यानं अन्नपदार्थ दुषित होण्याचा धोका असतो. (How to Get Rid of Cockroaches From Your Home Remedies) अन्नाचे कण पडले असतील किंवा स्वंयपाकघरात खरकटं जास्त झालं असेल तर लगेच झुरळं (Cockroach in kitchen) होतात. काही सोप्या टिप्स  वापरून तुम्ही झुरळांपासून आराम (Home remedy) मिळवू शकता. 

झुरळं पळवण्याची पहिली पद्धत

एक वाटी पीठ, दोन चमचे साखर, एक चमचा हळद आणि दोन चमचे बोरिक पावडर एकत्र करा. ही पेस्ट किचनची भिंत, स्लॅबवर लावा ज्या ठिकाणी कॉकरॉच जास्त येतात असं तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी ही पेस्ट ठेवा. असं केल्यानं कॉकरॉच घरापासून दूर राहतील.

बोरीक पावडर

कोणत्याही दुकानातून तुम्हाला हे सहज मिळेल. या पावडरचे छोटे गोळे तयार करा. स्वयंपाकघरात जिथे झुरळ असतील तिथे एक एक गोळी ठेवली तरी झुरळं नाहीसे होतील आणि महिन्यातून किंवा वीस दिवसातून एकदा असे करत राहिल्यास झुरळं पुन्हा स्वयंपाकघरात येणार नाहीत.

कडुलिंबाचा स्प्रे

पावसाळ्यात घराच्या आजूबाजूला चिखल, ओलावा असल्यानं अनेक किडे येऊ लागतात. अशा स्थितीत तुम्ही स्प्रे बाटलीच्या मदतीने संपूर्ण घरात कडुलिंबाचे तेल किंवा पाणी शिंपडू शकता. ही पद्धत देखील खूप प्रभावी ठरेल.

तमालपत्र

तमालपत्र मिक्सरमध्ये बारीक करून गरम पाण्यात मिसळा आणि घरभर शिंपडा. तमालपत्राच्या वापरानंतर घरातील  झुरळांचा वावर कमी होईल.

लवंग

लवंग बारीक करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यांवर याचे पाणी शिंपडा. त्याच्या उग्र वासामुळे झुरळ घरात किंवा जवळपासही दिसणार नाहीत. याशिवाय या ऋतूत येणारे सर्व किडे आणि कोळीही घरात दिसणार नाहीत.

उष्टी भांडी ठेवू नका

घरांमध्ये झुरळं येणे थांबवायचे असेल तर स्वयंपाकघर अतिशय स्वच्छ ठेवा. उष्टी भांडी सोडू नका तसेच डस्टबिन नेहमी स्वच्छ ठेवा.

बेकींग सोडा

प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात बेकिंग सोडा सहज उपलब्ध असतो, फक्त एका कपात पाणी घ्या आणि त्यात बेकिंग सोड्यासह साखर मिसळा आणि हे द्रावण स्वयंपाकघरात आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जिथे झुरळ असतील तिथे टाका,  साखरेचा वास झुरळांना आकर्षित करतो. बेकिंग सोडा हे झुरळांसाठी विषासारखे आहे, म्हणून ते स्वतःहून बाहेर पडतात आणि द्रावणाला चिकटल्याबरोबर पळून जातात किंवा मरतात. त्याचा सुगंध स्वयंपाकघरातही बराच काळ टिकून राहतो, त्यामुळे झुरळेही परत येत नाहीत.

Web Title: How to Get Rid of Cockroaches From Home : How to Get Rid of Cockroaches From Your Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.