Join us

घरात झुरळांचे थैमान? वापरून पाहा ४ घरगुती सोपे उपाय, काही मिनिटात कॉकरोच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2023 13:40 IST

How to Get Rid of Cockroaches From Your Home Remedies : पेस्टीसाईडसपेक्षा घरगुती उपायांनी झुरळांना पळवून लावा, पाहा सोपे उपाय

ठळक मुद्देपेस्टीसाईडसपेक्षा घरगुती ४ सोपे उपायांनी आपण झुरळांना पळवून लावू शकता.

घरात अनेक प्रकारचे कीटक आणि कोळी फिरत असतात. घर कितीही वेळा साफ केले तरी कीटक वारंवार पुन्हा घरात शिरतात. मुख्य म्हणजे घरात झुरळं (Cockroach) झालीत की त्यांना घालवणं कठीण होऊन जाते. झुरळं घरभर फिरतात, व सर्वत्र घाण करतात. यासह किचनमध्ये देखील झुरळांचा वावर दिसतो. रात्रीच्या वेळेस किचन ओटा, भांड्यांवरून झुरळं फिरतात. ज्यामुळे रोगराई पसरते.

मोठ्या झुरळांपासून लहान झुरळं देखील घरभर थैमान घालतात. जर झुरळांपासून आपण देखील त्रस्त असाल तर, ४ वस्तूंचा वापर करून पाहा. पेस्टीसाईडसपेक्षा घरगुती उपाय उत्तम ठरू शकतात. या गोष्टींचा वेळीच वापर केल्याने झुरळं घरातून पळून जातील(How to Get Rid of Cockroaches From Your Home Remedies).

बेकिंग सोडा आणि साखर

बेकिंग सोडा आणि साखरेचा वापर करून आपण झुरळांपासून सुटका मिळवू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा बेकिंग सोडा घ्या, त्यात अर्धा चमचा साखर मिसळा. जिथे झुरळांचा वावर जास्त आहे, त्या ठिकाणी तयार पावडर शिंपडा. अशा स्थितीत साखरेच्या वासाने झुरळं बाहेर पडतील, व बेकिंग सोडामुळे झुरळं पळून जातील.

भांडी घासण्याचा साबण लवकर संपतो, विरघळून चिखल होतो? १ ट्रिक-साबण लवकर संपणार नाही

कडूलिंबाचे तेल व पावडर

कडूलिंबाच्या उग्र वासामुळे झुरळं घरात थांबत नाही. झुरळांना वास खूप लवकर येत असल्याने ते वासाच्या दिशेने जातातच. यासाठी कडूलिंबाची काही पानं वाळवून घ्या. त्यानंतर त्याची पावडर तयार करा. ही पावडर झुरळं असलेल्या ठिकाणी टाका. आपण कडूलिंबाच्या तेलाचा देखील वापर करू शकता. याच्या उग्र वासामुळे झुरळं लवकर मरतात.

तमालपत्र

तमालपत्र देखील झुरळांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरते. आपण तमालपत्राचा स्प्रे तयार करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा. नंतर त्यात तमालपत्राची काही पानं टाका. पाण्याला उकळी आल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवा, व तयार पाणी एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा. ज्या ठिकाणी झुरळं जास्त दिसतील त्या ठिकाणी फवारणी करा. तमालपत्राच्या उग्र वासामुळे काही दिवसात झुरळं गायब होतील.

डिटर्जंट की साबण? कपडे धुण्यासाठी काय वापरणं योग्य? कपडे भुरकट न होता कायम नव्यासारखे हवे तर..

लवंग

लवंगामुळे देखील झुरळं घरातून पळून जातील. यासाठी ज्या ठिकाणी झुरळं असतील त्या ठिकाणी लवंगाच्या काही कळ्या ठेवा. यामुळे झुरळं घरात येणार नाही, व घरात असलेले झुरळं पळून जातील.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल