पावसाळ्यात आपण घर स्वच्छ ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी झुरळ, माशा, डास घरात होतातच. कारण या दिवसात सगळीकडेच एक ओलसरपणा, कुबटपणा असतो. यामुळे असे किटक होण्यास ते वातावरण पोषक ठरते आणि मग अशा किटकांचा घरात सुळसुळाट वाढतो. तुमच्याही घरात झुरळांचं प्रमाण वाढलं असेल (How to Get Rid of Cockroaches) आणि ती घालवून टाकण्यासाठी केमिकलयुक्त स्प्रे मारायला नको वाटत असेल, तर हा एक घरगुती उपाय करून बघा.(Natural ways to get rid of)
हा उपाय इंस्टाग्रामच्या anjums.kitchen या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी कोणतेही केमिकल्स वापरलेले नाहीत. यामध्ये वापरण्यात आलेल्या चारही वस्तू आपल्या घरगुती उपयोगाच्याच आहेत.
‘तारीफ करु क्या..’- अजय देवगणने काजोलला लेकीसह दिली वाढदिवसाची खास भेट
त्यामुळे हा स्प्रे अजिबातच हानिकारक नाही. बऱ्याचदा घरात लहान मुलं असतील तर केमिकलयुक्त स्प्रे वापरणे नको वाटते. अशावेळी हा एक प्रयोग तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.
कसा तयार करायचा झुरळांना पळवून लावणारा स्प्रे?
- हा होममेड स्प्रे तयार करण्यासाठी आपल्याला एक कप ॲपलसाईड व्हिनेगर, ८ ते ९ लवंग, एका लिंबाचे साल आणि एक टेबलस्पून हँड सॅनिटायझर अशा ४ गोष्टी लागणार आहेत.
- हे सगळे मिश्रण एका भांड्यात एकत्र करा आणि व्यवस्थित हलवून घ्या.
- त्यानंतर हे मिश्रण एका बाटलीत भरून ठेवा आणि घरात जिथे- जिथे झुरळ येतील तिथे- तिथे हा स्प्रे मारा.
पावसाळी हवेमुळे घशात खवखव, टॉन्सिल्सचा त्रास? २ योगमुद्रा करा, त्रास होईल कमी
- जर स्प्रे असणारी बाटली घरात नसेल तर कापसाचा वापर करूनही हा प्रयोग करू शकता. कापसाचे छोटे छोटे बोळे करा. ते या मिश्रणात बुडवा आणि जिथे झुरळ नेहमी दिसत असतील तिथे ते ठेवून द्या. घरातल्या ओलसर जागा, अडगळीच्या जागा, सिंक, स्वयंपाक घरातली ट्रॉलीच्या खाली असणारी जागा अशा ठिकाणीही स्प्रे मारून ठेवा.
- हा उपाय केल्यानंतर अवघ्या दोन- तीन दिवसातच घरातून झुरळांचे दिसणे कमी होईल.