जस जसा काळ बदलत चालला आहे. तस तसं महिलावर्गामध्ये फॅन्सी किचनची आवड निर्माण होत आहे. पण कितीही फॅन्सी किचन असले तरी, थोड्याशा घाणीमुळे घरभर झुरळांचा वावर वाढत जातो. झुरळांची दहशत कमी करण्यासाठी आपण बरेच उपाय करून पाहतो. झुरळांमुळे सर्वांनाच त्रास होतो (Cleaning Tips). मुख्य म्हणजे किचनच्या भांड्यांवर झुरळं फिरल्याने आरोग्य बिघडते.
झुरळ येणे म्हणजे घरात घाण वाढणे आणि स्वच्छता नष्ट होण्याचे लक्षण आहे (Cockroach). जर आपल्याला केमिकल उत्पादनांचा वापर न करता झुरळांचा नायनाट करायचा असेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. या उपायांमुळे झुरळं परत घरात शिरणार नाही(How To Get Rid Of Cockroaches In Kitchen Cabinets-4 Tips).
झुरळांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय
काकडी
काकडीचा वापर आपण सॅलड आणि स्किन केअरसाठी करतो. पण आपण याचा वापर झुरळांना पळवून लावण्यासाठीही करू शकता. झुरळांना काकडीचा गंध अजिबात आवडत नाही. याच्या गंधामुळे झुरळं पळून जातात. आपण रात्रीच्या वेळेस काकडीचे काही तुकडे सिंक, किचन ड्रेन आणि खिडकीजवळ ठेऊ शकता. यामुळे झुरळांना न मारता घरातून पळ काढतील.
वजन कमी करणं कठीण वाटतं? हळद आणि आल्याचा करा जबरदस्त उपाय; डाएट-जिमशिवाय घटेल वजन
बेकिंग सोडा आणि साखर
बेकिंग सोडा आणि साखरेच्या वापराने आपण झुरळांना पळवून लावू शकता. यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा आणि साखर पावडर समान प्रमाणात मिसळा. तयार मिश्रण ज्याठिकाणी झुरळांचा वावर आहे, त्या ठिकाणी ठेवा. याच्या गंधाने झुरळं पुन्हा त्या ठिकणी फिरकणार नाही.
रॉकेल
लहान किंवा मोठे कीटक आणि झुरळे दूर करण्यासाठी केरोसीन तेल प्रभावी ठरते. ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे, त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस थोडे तेल फवारा. रॉकेलच्या गंधामुळे कीटक पळ काढतील. पण सकाळी केरोसीन पुसून काढायला विसरू नका.
पाठदुखीने हैराण? उठता-बसताही येत नाही? रोज खा चमचाभर 'ही' पावडर; पन्नाशीनंतरही राहतील हाडं मजबूत
तमालपत्र
तमालपत्राचा वापर केवळ स्वयंपाकासाठीच केला जात नाही, तर झुरळांना पळवून लावण्यासाठीही करू शकता. किचनमध्ये जिथे-जिथे झुरळं फिरतात. तिथे तमालपत्र ठेवा. याच्या उग्र गंधामुळे झुरळं पुन्हा त्या जागी फिरकत नाही.