Lokmat Sakhi >Social Viral > सिंकच्या पाईपमध्ये लपलेल्या झुरळांचा बंदोबस्त करायचाय? ३ जबरदस्त उपाय; एकही झुरळ दिसणार नाही

सिंकच्या पाईपमध्ये लपलेल्या झुरळांचा बंदोबस्त करायचाय? ३ जबरदस्त उपाय; एकही झुरळ दिसणार नाही

How to Get Rid Of Cockroaches in Your Sink and Drains : बेकिंग सोड्यामध्ये मिसळा १ खास पदार्थ; झुरळं होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 04:03 PM2024-08-28T16:03:39+5:302024-08-28T16:04:58+5:30

How to Get Rid Of Cockroaches in Your Sink and Drains : बेकिंग सोड्यामध्ये मिसळा १ खास पदार्थ; झुरळं होतील गायब

How to Get Rid Of Cockroaches in Your Sink and Drains | सिंकच्या पाईपमध्ये लपलेल्या झुरळांचा बंदोबस्त करायचाय? ३ जबरदस्त उपाय; एकही झुरळ दिसणार नाही

सिंकच्या पाईपमध्ये लपलेल्या झुरळांचा बंदोबस्त करायचाय? ३ जबरदस्त उपाय; एकही झुरळ दिसणार नाही

झुरळांना पळवून लावणं म्हणजे कठीण काम (Cockroaches). घरात कॉकरोज झाल्यावर, काही दिवसात पिल्लीही घर तयार करतात. ज्यामुळे घरभर झुरळं होतात (Cleaning Tips). यावर उपाय म्हणून जेव्हा आपण केमिकल रसायनांचा वापर करतो, तेव्हा झुरळं कमी होतात (Social Viral). पण पुन्हा जेव्हा खरकटं किंवा उष्टे अन्नपदार्थ पडलेले दिसले की, बारीक झुरळं व्हायला सुरुवात होते.

केमिकल रासायनयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करून झुरळं घराबाहेर जातात. पण यामुळे आपण आजारीही पडू शकतो. केमिकल रसायन मानवी शरीरासाठी योग्य नाही. प्रॉडक्ट्सचा वापर न करता, आपण घरगुती उपायही करून पाहू शकता. यामुळे झुरळांपासून नक्कीच सुटका मिळू शकेल(How to Get Rid Of Cockroaches in Your Sink and Drains).

झुरळांवर घरगुती उपाय

बेकिंग सोडा आणि साखर

बेकिंग सोडा आणि साखर फक्त स्वयंपाकासाठी नसून, याचा वापर आपण झुरळांना पळवून लावण्यासाठीही करू शकता. यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा घ्या, त्यात समप्रमाणात साखर मिसळा. तयार मिश्रणाचे गोळे तयार करून झुरळांचा ज्याठिकाणी वावर आहे, ठिकाणी ठेवावे. या मिश्रणामुळे झुरळांचा अंत होईल.

रात्री पाण्यात भिजवा, सकाळी खा ‘या’ ६ प्रकारच्या बिया- गळणारे केस-वाढलेलं वजन होईल कमी

कडुलिंबाचे तेल

कडूलिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक आढळते. मानवी शरीरासाठी जितकं फायदेशीर तितकं कीटकांसाठी घातक ठरते. आपण कडूलिंबाचा वापर करून झुरळांपासून सुटका मिळू शकते. यासाठी कडुलिंबाचे तेल घ्या आणि स्प्रे बाटलीत भरा. ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे, त्या ठिकाणी स्प्रे करा. यामुळे झुरळं घरातून पल काढतील.

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात; पचनक्रिया बिघडेलच- फुफ्फुसावरही होईल परिणाम

बोरिक ॲसिड

बाजारात सहज उपलब्ध असलेल्या बोरिक ॲसिडमुळे झुरळं घरातून पळ काढतील. ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे, त्या ठिकाणी बोरिक ॲसिड शिंपडा. यामुळे नक्कीच झुरळं घरातून पळ काढतील.

Web Title: How to Get Rid Of Cockroaches in Your Sink and Drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.