घराच्या कानाकोपऱ्यांत सतत फिरणारी झुरळं पाहून नकोसे वाटते. घरांतील झुरळांचा वावर पाहून जीव नकोसा होतो. सतत इकडे - तिकडे फिरणारी झुरळं पाहून किळसवाणे वाटते. घरातील झुरळांना (How To Get Rid Of Cockroaches Using Naphthalene Balls White Dambar Goli) घराबाहेर घालवण्यासाठी आपण अनेक उपाय (Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently) करुन पाहतो. झुरळांना घालवण्यासाठी आपण महागडे, आणि हानिकारक केमिकल्सयुक्त स्प्रे, औषधं, गोळ्यांचा वापर करतो. परंतु या औषधांमधील हानिकारक केमिकल्स आणि रसायनं आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतात. या स्प्रे, औषधं, गोळ्यांच्या वासाने डोकेदुखी, श्वास घेण्यास अडथळा किंवा अशा अनेक लहान मोठ्या आरोग्याच्या समस्या त्रास देऊ शकतात( Effective Ways to Get Rid of Cockroaches).
यासाठीच, घरातील झुरळांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन झुरळांचा नायनाट करु शकतो. झुरळांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण फार पूर्वीपासून डांबर गोळ्यांचा वापर करतोच. परंतु झुरळांसाठी फक्त डांबर गोळ्या वापरण्याऐवजी, याच गोळ्यांचा वापर करून आपण एक घरगुती रामबाण उपाय करु शकतो. झुरळांना घालवण्यासाठी डांबर गोळ्यांचा नेमका वापर कसा करायचा ते पाहा.
साहित्य :-
१. डांबर गोळ्या - ५ ते ६ गोळ्या
२. गव्हाचे पीठ - २ ते ३ टेबलस्पून
३. हार्पिक लिक्विड - १ टेबलस्पून
४. बोरिक पावडर - १ टेबलस्पून
५. पाणी - गरजेनुसार
सोन्याच्या बांगड्या काळपट दिसतात, चमक गेली? ४ टिप्स, सोपे आणि सुरक्षित घरगुती उपाय...
कृती :-
१. सगळ्यात आधी डांबर गोळ्या घेऊन त्या ठेचून त्याची बारीक पूड तयार करुन घ्यावी.
२. आता एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, डांबर गोळ्यांची बारीक पूड असे दोन्ही घटक एकत्रित मिसळून घ्यावे.
३. आता या पावडरच्या मिश्रणात थोडे हार्पिक लिक्विड आणि बोरिक पावडर घालावी.
फक्त १५ मिनिटांत करा साजूक तुपाच्या फुलवाती, करणं अगदी सोपं आणि उजळतात एक तास प्रसन्न...
४. सगळ्यात शेवटी या मिश्रणात गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून त्याची पातळसर पेस्ट करून घ्यावी. (पेस्ट एकदम पातळ किंवा घट्ट करू नये, मध्यम कन्सिस्टंन्सीची पेस्ट करावी.)
५. तयार पेस्ट लहान लहान कागदांच्या तुकड्यांवर चमचाभर घालून ज्या ठिकाणी झुरळांचा वावर जास्त असेल त्या ठिकाणी ठेवून द्यावे.
या उपायामुळे झुरळं गव्हाच्या पिठाच्या वासाने या मिश्रणाकडे आकर्षित होतील, आणि या मिश्रणातील विषारी घटकांमुळे जागीच मरुन पडतील. घरातील झुरळांना घालविण्याचा हा एक असरदार उपाय आहे.