Lokmat Sakhi >Social Viral > पेस्ट कंट्रोलने कमी न होणारी झुरळंही जातील कायमची घराबाहेर, १ वाटी तुळशीच्या पानांचा खास उपाय...

पेस्ट कंट्रोलने कमी न होणारी झुरळंही जातील कायमची घराबाहेर, १ वाटी तुळशीच्या पानांचा खास उपाय...

How To Get Rid Of Cockroaches Using Tulsi Leave : Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently : Effective Ways to Get Rid of Cockroaches : अंगणातील तुळशीची पानच करतील घरातील झुरळांचा नायनाट... एकही झुरळ दिसणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 16:08 IST2025-03-27T15:52:55+5:302025-03-27T16:08:56+5:30

How To Get Rid Of Cockroaches Using Tulsi Leave : Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently : Effective Ways to Get Rid of Cockroaches : अंगणातील तुळशीची पानच करतील घरातील झुरळांचा नायनाट... एकही झुरळ दिसणार नाही...

How To Get Rid Of Cockroaches Using Tulsi Leave Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently Effective Ways to Get Rid of Cockroaches: | पेस्ट कंट्रोलने कमी न होणारी झुरळंही जातील कायमची घराबाहेर, १ वाटी तुळशीच्या पानांचा खास उपाय...

पेस्ट कंट्रोलने कमी न होणारी झुरळंही जातील कायमची घराबाहेर, १ वाटी तुळशीच्या पानांचा खास उपाय...

घरात सतत इकडून - तिकडून फिरणारी झुरळं पाहून आपल्याला किळस वाटते. घरातील टेबल, खुर्च्या, किचन ट्रॉली अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही झुरळं लपून बसतात. अशा या घराच्या कानाकोपऱ्यांत (How To Get Rid Of Cockroaches Using Tulsi Leave) राहणाऱ्या झुरळांचे प्रमाण वाढू लागले की त्यांचा सुळसुळाट घरभर होतो. घरभर अशा मोकाट फिरणाऱ्या झुरळांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. घरांतील झुरळांचे प्रमाण कमी करण्यासाठी (Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently) आपण महागडे स्प्रे, गोळ्या किंवा लिक्विडचा वापर करतो. परंतु या लिक्विड्स, गोळ्या, स्प्रे मध्ये अनेक हानिकारक केमिकल्स असतात. ज्यांच्या उग्र वासामुळे अनेकदा आपल्याला देखील त्रास होतो. यासाठीच घरातील झुरळांचे प्रमाण कमी करण्यासाठी केमिकल्सयुक्त गोळ्या, स्प्रेचा वापर करण्यापेक्षा आपण घरगुती उपाय करू शकतो(Effective Ways to Get Rid of Cockroaches).

घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंगणातील तुळशीची वाटीभर पाने लागतील. तुळशीची पाने औषधी असल्याने याचे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकत नाहीत, परंतु झुरळांना पळवून लावण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर हा एक असरदार उपाय आहे. घरातील झुरळांना पळवून लावण्यासाठी घरच्या घरीच तुळशीचा उपाय कसा करायचा ते पाहा. 

झुरळांचे प्रमाण कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा असा करा वापर.... 

१. तुळशीच्या पानांना आयुर्वेदात खूप महत्व आहे. यातील औषधी गुणधर्मामुळे तुळस वेगवेगळ्या आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. इतकेच नाही तर तुळशीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्याने ती त्वचा आणि केसांसाठी देखील वापरली जाते. यासोबतच, तुळशीचा उग्र वास आणि त्यातील काही गुणधर्मांमुळे किडे - मुंग्या, झुरळं - पाली यांना तुळस आवडत नाही. यासाठीच तुळशीच्या पानांचा वापर करून आपण घरातील झुरळांना पळवून लावू शकतो. 

फक्त वाटीभर पॉपकॉर्न करतील उंदरांचा बंदोबस्त, करा 'हा' उपाय - घरातील उंदरांचा उपद्रव कायमचा थांबेल!

तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

२. तुळशीच्या पानांची पावडर झुरळांना घरातून घालवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी वाटीभर तुळशीची पाने घेऊन तिची एका ताटात पसरवून ३ ते ४ दिवस कडक उन्हांत वाळवून घ्या. त्यानंतर ही वाळलेली पाने मिक्सरमध्ये फिरवून त्याची एकदम बारीक पूड करून घावी ही पूड तुम्ही ज्या भागात झुरळं आहेत तिथे फरशीवर पसरवून घालावी. तुळशीच्या पानांच्या उग्र वासामुळे झुरळं पुन्हा फिरकणार देखील नाहीत. यासोबतच, तुम्ही तुळशीची पाने छोट्या - छोट्या बाऊलमध्ये भरून देखील ठेवू शकता.  

३. तुळशीची पाने आणि पाणी यांची एकत्रित पातळ पेस्ट मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. ही तयार पेस्ट फरशीवर ओतावी किंवा भिंतीवर ब्रशच्या मदतीने पसरवून लावावी. यामुळे देखील झुरळांचे घरातील प्रमाण कमी होऊ शकते. 

४. तुळशीच्या पानांच्या तेलाचे ५ ते ६ थेंब अर्धा लिटर पाण्यांत मिसळून ते पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. घरातील कानाकोपऱ्यांत हे पाणी स्प्रे बॉटलने फवारून घ्यावे. त्यामुळे देखील झुरळांची संख्या कमी होऊ शकते. 

अशाप्रकारे आपण अंगणातील तुळशीच्या पानांचा वापर करून घरातील झुरळांना घरातून पळवून लावू शकता.

Web Title: How To Get Rid Of Cockroaches Using Tulsi Leave Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently Effective Ways to Get Rid of Cockroaches:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.