घरात फिरणारी झुरळं कोणालाच आवडत नाहीत. बरेच लोक झुरळांकडे दुर्लक्षसुद्धा करतात. पण झुरळं बॅक्टेरिया पसरवण्याचे काम करतात (Home Hacks). जेवणाची भांडी, भाज्या आणि फळांवर काही बॅक्टेरिया राहतात. ज्यामुळे या आजारांचा धोका वाढतो. (How To Get Rid Of Cockroaches) लादी पुसल्यानंतर फरशीवर झुरळं फिरताना दिसत असतील तर तुम्ही या झुरळांना सहज पळवून लावू शकता. बादलीत लवंगासोबत काही पदार्थ मिसळले तर फरशीवर झुरळं दिसणं कायमचं बंद होईल. (How To Get Rid Of Cockroaches While Mopping Floor)
हाय केअर, से हाय टू हायजिनच्या रिपोर्टनुसार झुरळांना पळवून लावण्यासाठी बोरिक एसिड, लिंबाचा रस, कडुलिंब, सिट्रस, बेकिंग सोडा आणि साखर, इसेंशिअल ऑईल्सचा वापर करू शकता. ज्या ठिकाणी झुरळं येतात जसं की खिडक्या, दरवाजे, घराचे कोपरे, किचन-ओटा अशा ठिकाणी व्हिनेगर, काकडीच्या स्लाईस, मिंट ऑईल, आलं-लसणाचा पेपर स्प्रे यांचा समावेश करा.
लवंगाचे पाणी
साध्या पाण्यानं लादी पुसणं क्लिनिंगसाठी फारसं असरदार मानलं जात नाही. घरातील झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही लवंगाचा वापर करू शकता. लवंगाचा तीव्र वास झुरळांना अजिबात आवडत नाही. याची पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून उकळवून घ्या. नंतर हे मिश्रण बादलीत मिसळून लादी पुसून घ्या.
तमालपत्राची पेस्ट
झुरळांना तमालपत्राचा वास अजिबात आवडत नाही. यासाठी तुम्ही लादी पुसताना तमालपत्राच्या पेस्टचा वापर करू शकता. पाणी घालून सगळ्यात आधी पानांची पेस्ट तयार करून घ्या. नंतर एका डब्यात ठेवा. जेव्हा तुम्ही लादी पुसाल तेव्हा त्यात १ चमचा ही पेस्ट घाला.
कारल्याची पेस्ट
कारल्याची भाजी बनवताना लोक अनेकजण याची सालं काढून फेकून देतात. झुरळांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कारल्याची पेस्ट फायदेशीर ठरू शकते. कारल्याची पेस्ट तयार करून १ चमचा पेस्ट लादी पुसण्याच्या पाण्यात घाला. जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा पेस्ट खूपच घट्ट आहे तर तुम्ही यात पाणी मिसळून कारल्याचं पाणी घालू शकता.
हार्ड केमिकल्सचा वापर करू नका
घरात मुलांना जमिनीवर खेळायला आवडत असेल तर तुम्ही झुरळांना पळवून लावण्यासाठी हार्ड केमिकल्सचा टाळा. कारण मुलांचे हात फरशीवर लागतात. अनेकदा खाली पडलेल्या वस्तू मुलं तोंडात घालतात. त्यामुळे फरशी स्वच्छ करण्यासाठी हार्ड केमिकल्सचा वापर करू नका.