Join us  

कॉलरवरचे डाग घासूनही निघत नाही? चमचाभर टूथपेस्टची कमाल; डाग गायब-शर्ट चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 2:10 PM

How to Get Rid of Collar Stains by using Toothpaste : कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर मळके दिसत असेल तर, टूथपेस्टचा वापर करून पाहा..

काम असो किंवा पार्टी पुरुष मंडळी आवडीने फोर्मल शर्ट घालतात. विविध रंगाचे फोर्मल शर्ट पुरुषांवर उठून दिसतात. मुख्य म्हणजे सफेद रंगाच्या शर्टामुळे पुरुषांच्या पर्सनॅलिटीमध्ये चारचांद लागतात. पण बऱ्याचदा मळलेल्या कॉलरमुळे शर्ट तर घाण दिसतेच, शिवाय चारचौघात लाजिरवाणेही वाटते (Social Viral). मळलेला कॉलर धुण्यासाठी आपण विविध पर्याय अवलंबून पाहतो. पण अनेक उपाय करूनही कॉलरवरचे मळके डाग लवकर निघत नाही.

कॉलरसह हाताचे कफ आणि अंडरआर्म्सवरचे काळपट डाग घासूनही निघत नाही (Cleaning Tips). जर कॉलरवरचे डाग काही केल्या निघत नसतील तर, टूथपेस्टचा वापर करून पाहा. टूथपेस्टच्या वापराने फक्त दात नसून शर्ट देखील चकाचक स्वच्छ दिसेल(How to Get Rid of Collar Stains by using Toothpaste).

कॉलरवरचे डाग काढण्यासाठी टूथपेस्टचा सोपा उपाय

लागणारं साहित्य

टूथपेस्ट

मीठ

पाली ठोकतील धूम, फक्त करा ३ सोपे घरगुती उपाय- घरात एकही पाल फिरकणार नाही..

डिटर्जेंट

डाग काढण्यासाठी टूथपेस्टचा वापर कसा करावा?

सर्वप्रथम, शर्ट पाण्याने ओला करून घ्या. कॉलरवर टूथपेस्ट लावा. त्यावर मीठ शिंपडून हाताने कॉलर घासून काढा. ५ मिनिटांसाठी घासून घेतल्यानंतर त्यावर डिटर्जेंट किंवा कपडे धुण्याचा साबण लावून शर्ट धुवून घ्या. या ट्रिकमुळे काही मिनिटात शर्टवरचे डाग यासह कॉलरवरचे हट्टी डाग मिनिटात साफ होईल.

कॉलरला डागांपासून दूर कसे ठेवावे?

फ्रीज भिंतीला अगदी खेटून ठेवलाय? ५ धोके, फ्रीज बिघडेल आणि बिलही येईल भरमसाठ

मानावरील घाम आणि घाण यामुळे कॉलरवर डाग पडतात. त्यामुळे वारंवार कॉलर घाण होण्यापासून वाचवायचं असेल तर, शरीराच्या स्वच्छतेची चांगली काळजी घ्या. मानेवरील घाम कमी करण्यासाठी पावडर वापरा. मुख्यतः गडद रंगाच्या शर्टाचा वापर करा. कारण त्यात डाग फारसे दिसत नाहीत.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल