पावसाळ्याच्या (Monsoon) दिवसांत बाथरूममध्ये किटक, गोम, गांडूळ मोठ्या प्रमाणात दिसतात. बाथरूम आणि सिंकमधून किटक बाहेर येतात. अनेकदा गांडूळ, किटक येतात त्यानंतर ते कानात शिरतात. काही सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. काही मिनिटांत तुम्ही बाथरूममधून निघणाऱ्या किटकांपासून सुटका मिळवू शकता. बाथरूम आणि सिंकमध्ये तुम्हाला किटक, गांडूळ दिसले तर ते काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. (How To Get Rid Of Earthworm in Bathroom)
स्ट्रोम.साच्या रिपोर्टनुसार बेसिन आणि बाथरूमचा परिसर स्वच्छ ठेवा. बेसिक क्लिनिंग केल्यानंतर फायर वॉटर, व्हिनेगरचा वापर करा. मोठ्या ब्रशनं ड्रेन्स क्लिन करा. बाथरूममधील छिद्र, भेगा बुजवण्याचा प्रयत्न करा. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही घर स्वच्छ, नीटनेटकं ठेवू शकता.
1) बाथरूम स्वच्छ ठेवा
गांडूळ बाथरूमच्या सिंकमध्ये येतात. खासकरून अशा ठिकाणी दिसतात जिथे साफ-सफाई नीट केली जात नाही. बाथरूमचा उपयोग केल्यानंतर स्वच्छ, वॅक्यूम क्लिन करायला हवं. नेहमी बाथरूम स्वच्छ साफ ठेवा. ज्यामुळे एकही किटक दिसणार नाही.
अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? ५ पदार्थ खा- खर्च फक्त २० रुपये! कॅल्शियम भरपूर
2) गांडूळांना पळवून लावण्याचे उपाय
जर बाथरूमच्या नळीतून सतत किटक बाहेर येत असतील तर एक जाळी फिट करून ठेवा. त्यानंतर काही दिवस बाजारात मिळणाऱ्या स्प्रे चा छिडकाव करा. एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा आणि त्यात रिफाईंड तेल मिसळा त्यानंतर बाथरूमच्या कानाकोपऱ्यात जिथे झुरळं येतात तिथे नियमित स्प्रे करत राहा. लिंबात पाणी मिसळून याची जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट अशा फटींमध्ये ठेवा जिथे गांडूळ येतात.
बाथरूमध्ये फटी असतील तर तिथेही लावा जेणेकरून झुरळं दूर पळण्यास मदत होईल. जेव्हा बाथरूममधून अधिक गांडूळ बाहेर येतात तेव्हा रात्री बाथरूमध्ये व्हिनेगर आणि डेटॉल शिंपडा. काही दिवस या स्टेप्स फॉलो केल्यास गांडूळ घरात शिरणार नाहीत.
खाण्यापिण्याबात WHO नं दिल्या गाईडलाईन्स; तब्येत चांगली ठेवायची तर काय खायचं, काय टाळायचं- पाहा
एका स्प्रे बॉटलमध्ये पेपरमिंट ऑईल आणि पाणी घाला त्यानंतर व्यवस्थित शेक करा. रात्री झोपण्याच्या आधी हे मिश्रण नाला किंवा घरातील कोपऱ्यावर स्प्रे करा जिथून गांडूळ घरात प्रवेश करण्याची शक्यता असते. नियमित रात्री झोपताना हा उपाय केला तर घरात गांडूळ शिरणार नाहीत. पेपरमिंट ऑईलमध्ये एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे किटक दूर राहतात. जर तुमच्याकडे पेपरमिंट ऑईल नसेल तर पुदिन्याच्या सुकलेल्या पानांचा वापरही करू शकता.