Join us  

बाथरूममधून गांडूळ-गोम बाहेर येतात? ३ उपाय-एकही गांडूळ घरात येणार नाही, करा कायमचा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 2:43 PM

How To Get Rid Of Earthworms In bathroom : घरातले किटक आणि गांडूळ दूर करण्यासाठी काही सोपे उपाय  करू शकता

पावसाळा असो किंवा ऊन्हाळा... गांडूळ आणि गोम किचन सिंकचा पाईप, टॉयलेट, बाथरूम आणि नाल्यातून दिसून येतात.  ज्यांचे घर तळ  मजल्यावर किंवा पहिल्या मजल्यावर असते तिथे गांडूळ जास्त येतात. गोम किंवा किडे चावल्यानं किंवा कानात शिरल्यानं आरोग्याचे नुकसानही होऊ शकते. अनेकदा हे किटक रात्रीच्यावेळेस कानात शिरतात. घरातले किटक आणि गांडूळ दूर करण्यासाठी काही सोपे उपाय  करू शकता. (How To Get Rid Of Earthworms In bathroom)

जर्मनी ब्रिलिएंटच्या रिपोर्टनुसार घरात ड्रेनेज सिस्टीम चुकीची असणं, फरश्या व्यवस्थित बंद नसणं यामुळे फरशीतून गांडूळ बाहेर येतात. बाथरूम नियमित कार्बोलिक एसिड आणि डिटर्जेंटनं स्वच्छ केल्यास बाथरूमध्ये जंत होत नाहीत. रासायनिक साफ सफाईचे द्रव वापरत असल्यास ते उघडलेल्या टाईल्समध्ये घाला (Ref). मिठाच्या द्रवाचे मिश्रण ५०० ग्रॅम मीठाच्या प्रमाणात ५ लिटर साबणाचे पाणी तयार करा. मिश्रण  एकत्र होईपर्यंत ढवळत राहा.  सर्व समान रितिनं मिसळल्यानंतर बाथरूमच्या भिंती आणि मजल्यांवर पाणी घाला. त्यानंतर बाथरूम समान रितिनं साफ करून घ्या. ( How To Get Rid Of Worms In The Toilet)

गोम, गांडूळ पळवण्याचे उपाय

किड्यांना दूर पळवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. जर घरात वारंवार गांडूळ येत असतील तर तुम्ही नैसर्गिक उपायांनी त्यांना पळवू शकता. किचनमध्ये  तमालपत्र असतेच, तमालपत्र  एका नॅच्युरल किटकनाशकाप्रमाणे काम करतो. ज्यामुळे किड्यांना  दूर ठेवता येते.  ५ ते ६ तमालपत्र पाण्यात घालून ठेवा. याच्या वासानं गांडूळ दूर राहतील.

शरीर निरोगी, धडधाकट ठेवण्यासाठी किती खावं, किती झोपावं? सद्गुरू सांगतात सोपं गणित

कडुलिंबाची पानं कडवट असतात. जखम, पिंपल्स दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे एका किटकनाशकाप्रमाणे काम करते. तुम्ही कडुलिंबाचे तेल मार्केटमधून विकत घेऊन पाण्यात मिक्स करू शकता. प्रत्येक ठिकाणी या पाण्याचा स्प्रे करा. तुम्ही या पानांची पेस्ट बनवून पाण्यात मिसळू शकता आणि स्प्रे प्रमाणे शिंपडू शकता.

पुदिन्याची पानं घेऊन  याचे तेल वापरल्यास तुम्ही गांडूळांना घरापासून दूर ठेवू सकता. यासाठी एका बॉटलमध्ये थोडं पाणी आणि पुदिन्याचं तेल मिक्स करा. त्यानंतर घरात काही जागांवर शिंपडा, काही दिवसातंच तुम्हाला दिसेल की गांडूळ घरात शिरणार नाहीत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसुंदर गृहनियोजनकिचन टिप्स