Join us  

पावसाळ्यात बाथरुम-टॉयलेटमध्ये दुर्गंधी येते? ४ टिप्स, गांडूळ-डासही राहतील दूर-वाटेल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 5:42 PM

How to Get Rid of Earthworms in Bathroom; Tips to keep bathroom clean in monsoon : बाथरूममधून दुर्गंधी येत असेल तर हे सोपे उपाय करा

पावसाळ्यात (Monsoon) घर कितीही स्वच्छ ठेवलं, तरी बाथरूम साफ करण्याचे राहून जाते (Cleaning Tips). पण पावसाळ्यात बाथरूम साफ करणं गरजेचं आहे. या दिवसात बाथरूम अस्वच्छ असेल तर, त्यात किडे, सरपटणारे प्राणी, पाली, झुरळं, गांडूळ आणि गोम फिरतात (Bathroom clean). ज्यामुळे बाथरूममध्ये कुबट वास पसरतो.

अशावेळी किड्यांना मारण्याची इच्छा होत नाही, शिवाय बाथरूम रोज साफ करणंही शक्य नाही. जर आपल्याही बाथरूममध्ये दुर्गंधी पसरली असेल तर, सोप्या ४ गोष्टी फॉलो करून पाहा. यामुळे बाथरूम स्वच्छ होईल, शिवाय बाथरूममध्ये पुन्हा कीटक फिरकणार नाही. बाथरूम दुर्गंधी मुक्त ठेवण्यासाठी कोणते उपाय करावे? पाहा(How to Get Rid of Earthworms in Bathroom; Tips to keep bathroom clean in monsoon).

एक्झॉस्ट फॅन

बाथरूम स्वच्छ असूनही, त्यातून दुर्गंधी पसरू लागते. पावसाळ्याच्या दिवसात बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन लावा. व्हेंटिलेशन व्यवस्थित नसेल तर बाथरूममध्ये दुर्गंधी पसरत राहील. जर बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन  लावायला जागा नसेल तर, खिडकी आणि बाथरूमचे दार उघडे ठेवा. यामुळे बाथरूममधून दुर्गंधी पसरणार नाही.

मुलांच्या बळकट हाडांसाठी फक्त दूध पुरेसं नाही, चमचाभर ‘ही’ पावडर दुधात घाला, हाडं होतील मजबूत

एसेन्शियल तेल

बाथरूममधून दुर्गंधी पसरत असेल तर, आपण एसेन्शियल तेलाचाही वापर करू शकता.याच्या वापराने बाथरूममधील दुर्गंधी सहज निघून जाईल. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा. त्यात कोणताही प्रकारचे एसेन्शियल तेल घालून मिक्स करा. नंतर भिंती, टॉयलेट सीट, फरशी इत्यादींवर स्प्रे करा.

बाथरूम टाईल्स

पावसाळ्यात बाथरूम टाईल्स अस्वच्छ होतात ओलसरपणामुळे कुबट गंध पसरते. यासाठी नेहमी बाथरूम टाईल्स स्वच्छ करा. यामुळे टाईल्समधून दुर्गंधी पसरणार नाही. क्लीनर, बेकिंग सोडा किंवा बाथरूम क्लीनर लिक्विडने टाईल्स स्वच्छ करू शकता.

तल्लख बुद्धी - उत्तम स्मरणशक्तीसाठी खा ४ पदार्थ; साठीतही राहील सगळं लक्षात; ब्रेन बनेल संगणक

टॉयलेट सीट स्वच्छ करा

पावसाळ्यात बाथरूमसह टॉयलेटही स्वच्छ करणं गरजेचं आहे. नियमित स्वच्छ न केल्यास त्यातून उग्र गंध येऊ लागतो. यासाठी टॉयलेट क्लीनर, बेकिंग सोडा , व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसाने टॉयलेट साफ करा.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल