Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळयात बेडूक घरात येऊ नयेत म्हणून ३ उपाय, बेडकांना न मारता दूर पळवा..

पावसाळयात बेडूक घरात येऊ नयेत म्हणून ३ उपाय, बेडकांना न मारता दूर पळवा..

How to Get Rid of Frogs : जिथे बेडूक दिसतील तिथे तुम्ही ही पद्धत वापरून पाहू शकता. (How to get rid of small frogs in house)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:05 PM2022-07-05T14:05:51+5:302022-07-05T14:34:40+5:30

How to Get Rid of Frogs : जिथे बेडूक दिसतील तिथे तुम्ही ही पद्धत वापरून पाहू शकता. (How to get rid of small frogs in house)

How to Get Rid of Frogs : How to Kill or Get Rid of Frogs and Toads During Moonsoon | पावसाळयात बेडूक घरात येऊ नयेत म्हणून ३ उपाय, बेडकांना न मारता दूर पळवा..

पावसाळयात बेडूक घरात येऊ नयेत म्हणून ३ उपाय, बेडकांना न मारता दूर पळवा..

पावसाळा सुरू होताच डास, किड्यांसोबत बेडूकही घरात शिरतात. अनेकांना बेडकांची भीती वाटते, अशा स्थितीत त्यांना हाकलणे खूप कठीण होते. (Monsoon tips) बेडूक तेव्हाच घरात येतात जेव्हा पाण्याचा स्रोत किंवा जवळ गवत असते. त्याच वेळी, घरात असे अनेक भाग आहेत जेथे बेडूक येऊ शकतात, जसे की पाण्याची टाकी, छप्पर, शौचालय किंवा बागेची जागा. (How to Get Rid of Frogs and Keep Them Away)

अनेकजण बेडकाला हाताने उचलून फेकतात, ही पद्धत योग्य नाही.  मारतात. मात्र तसे करु नये.  त्याऐवजी काही सोपे उपाय केले तर बेडकांना घराबाहेर काढताही येईल आणि त्यांना मारण्याचीही गरज नाही. (How to get rid of small frogs in house)

पावसाळ्यात बेडूक अन्नाच्या शोधात गवताळ आणि पाण्याच्या भागात स्थलांतर करतात. अशा स्थितीत जिकडे कीटक जमा होतात, तिथे बेडूक सहज येतात. त्यामुळे पावसाळ्यात घराबाहेरील जागेची अगोदरच स्वच्छता करणे आवश्यक आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यासाठी ब्लीचिंग पावडर वापरू शकता. एका भांड्यात ब्लीचिंग पावडर घ्या आणि बेडूक जिथे येतात तिथे सर्वत्र शिंपडा. तुम्ही कोरड्या ब्लीचिंग पावडरचा वापर पाण्याची टाकी, बागेत किंवा नाल्यात करू शकता.

1) मिठाचा वापर

बेडकांपासून मुक्त होण्यासाठी मीठ वापरले जाऊ शकते. आपण मीठ दोन प्रकारे वापरू शकता, कोरडे आणि द्रव स्वरूपात. बेडकांवर मीठ शिंपडलं जाणार नाही याची काळजी घ्या, कारण यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. बेडकांपासून मुक्त होण्यासाठी आजूबाजूच्या ठिकाणी मीठ शिंपडावे लागते.

घरात बेडूक आले तर लादी पुसताना त्यात मीठ वापरावे. आता या पाण्याच्या द्रावणाने लादी पुसून टाका. हे बेडकांना घरात प्रवेश करण्यापासून रोखेल. बेडूक पाण्याच्या टाकीमध्ये किंवा बागेच्या परिसरात आल्यास त्याभोवती मीठ शिंपडा. कधीकधी बेडूक टाकीमध्ये जातात, म्हणून आपण टाकीभोवती मीठ शिंपडू शकता.

प्यार किया तो डरना क्या! कोलकात्यात गे कपलने केलं लग्न, फोटो व्हायरल

2) कॉफीचा वापर

बेडकांपासून मुक्त होण्यासाठी मीठाप्रमाणेच तुम्ही कॉफी देखील वापरू शकता.  पावसाळ्यात बेडूक बागेच्या परिसरात किंवा जिथे पाणी आणि गवत आहे तिथे सहज येतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात कॉफी पावडर मिसळून उपाय तयार करा.

ऐन पावसात छत्री तुटली, रेनकोट फाटला तर तारांबळ उडते? 6 टिप्स, वर्षानुवर्ष टिकतील छत्र्या

आता हे द्रावण बागेच्या परिसरात किंवा बेडूक येतात त्या ठिकाणी फवारावे. आपण ते झाडांच्या आसपास देखील वापरू शकता, यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र, तुम्ही गरम पाणी वापरत असाल तर तापमानाची काळजी घ्या. पाणी जास्त उकळू नये.

3) खोलीत बेडूक शिरल्यावर असं पळवून लावा

 बागेचा परिसर असेल तर बेडूकही घरात घुसण्याची शक्यता असते.  तुम्ही लिंबू आणि व्हिनेगरचाही वापर करू शकता. ते तयार करण्यासाठी, आपल्याला प्रमाणाची काळजी घ्यावी लागेल. (How To Get Rid of Frogs In The Garden)

पाणी - 3 ते 4 ग्लास, लिंबू - २ ते ३, व्हिनेगर - 2 कप हे साहित्य घ्या नंतर  एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात व्हिनेगर मिसळा, त्यानंतर लिंबू कापून त्याचा रस मिसळा. द्रावण तयार झाल्यावर, तुम्ही ते स्प्रे बाटलीत भरून वापरू शकता.  तुम्हाला हे द्रावण रोपांना लावण्याची गरज नाही. बेडूक खोलीत आला तर त्याच्या आजूबाजूला  फवारणी करावी  यामुळे ते लगेच पळून जातात. 

Web Title: How to Get Rid of Frogs : How to Kill or Get Rid of Frogs and Toads During Moonsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.