पावसाळ्यात डास आणि माश्यांचा त्रास आपल्यालाही होतोच (Houseflies). या दिवसात आपण खिडक्या आणि दारं उघडी ठेवली तर, डास आणि माश्या घरात आनंदाने पाहुणे म्हणून घरात प्रवेश करतात (Cleaning Tips). या माश्या घरभर फिरतात. शिवाय किचनमधल्या खाद्यपदार्थांवरही जाऊन बसतात (Social Viral). ज्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माश्यांना वेळीच घरातून पळवून लावणं गरजेचं आहे.
माश्यामुळे घरात जीवाणू आणि जंतू पसरू नये, शिवाय माश्यांचा आपल्याला त्रास होऊ नये, असे वाटत असेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. माश्या घरात राहणारच नाही(How to get rid of house flies: 4 ways).
माश्यांपासून सुटका करण्यासाठी घरगुती उपाय
मिरचीचा स्प्रे
माश्यांना पळवून लावण्यासाठी आपण घरात मिरचीचा स्प्रे तयार करू शकता. मिरचीच्या स्प्रेचा गंध तीव्र असतो. ज्यामुळे डास आणि माश्या घरात शिरकाव करीत नाही, आणि घरात असलेल्या माश्या बाहेर पळ काढतात. आपण हवं असल्यास घरात मिरचीचा स्प्रे तयार करू शकता. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये लाल तिखट आणि पाणी घालून मिक्स करा. ज्या ठिकाणी माश्या आहेत त्या ठिकाणी ते शिंपडा.
दह्यात नेहमी साखर घालून खाता? पाहा ५ गंभीर दुष्परिणाम; वजन झपाट्याने वाढेलच आणि पचन..
जिंजर स्प्रे
आल्याच्या गंधामध्ये तिखटपणा असतो. ज्यामुळे घरात माश्या राहत नाहीत. आपण आल्याचा स्प्रे तयार करू शकता. आल्याच्या फवारणीने माश्या पळून जातील. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये ४ चमचे आल्याची पेस्ट घाला, नंतर त्यात ४ कप पाणी मिसळा. ज्या ठिकाणी माश्यांचा जास्त वावर आहे, त्या ठिकाणी स्प्रे करा.
कापूरचा वापर
कापूरचा वापर आपण माश्यांना दूर करण्यासाठी करू शकता. त्याचा गंध इतका तीव्र असतो की, माश्या लगेच पळून जातात. यासाठी कापूरचे गोळे बारीक करून पावडर तयार करा. नंतर पाण्यात मिसळा. तयार पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. जिथे माश्या दिसतील तिथे स्प्रे करा. माश्या पळून जातील.
ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर पदार्थांसाठी आणि वजन कमी करण्यासाठी केला जातो. पण याचा वापर आपण माश्यांना पळवून लावण्यासाठीही करू शकता. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये कपभर ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये थोडेसे निलगिरीचे तेल घालून मिक्स करा. तयार स्प्रे स्वयंपाकघरात स्प्रे करा. यामुळे माश्या सहज पळून जातील.