Join us  

पावसाळ्यात घरभर चिलटं, माश्या झाल्याने वैताग आला? १ सोपा उपाय करा, चिलटे- माश्या गायब....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2024 11:40 AM

Home Hacks: पावसाळ्याच्या दिवसात घरभर माश्या, चिलटे होतात. त्यांना पळवून लावण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा... (how to get rid of house flies and insects during monsoon?)

ठळक मुद्देघरभर आणि विशेषत: स्वयंपाक घरात तर जरा जास्तच फिरणाऱ्या माश्यांंमुळे, चिलटांमुळे कधीकधी खूप वैताग येतो.

पावसाळ्याच्या दिवसांत ओलसर, दमट वातावरण असतं. शिवाय पाऊस पडून गेल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचून राहाते. या पाण्यामुळे तसेच ओलसर, दमट वातावरणामुळे या दिवसांत चिलटं, माशा खूप होतात. आपल्या घरात सिंकजवळ, उघड्या राहिलेल्या अन्नपदार्थाजवळ, तसेच डायनिंग टेबल, ओटा याठिकाणी सांडलेल्या खरकट्या पदार्थांभोवती लगेचच माशा, चिलटे जमा होतात (how to get rid of house flies and insects during monsoon?). घरभर आणि विशेषत: स्वयंपाक घरात तर जरा जास्तच फिरणाऱ्या माश्यांंमुळे, चिलटांमुळे कधीकधी खूप वैताग येतो. म्हणूनच आता त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय केल्याने घरातल्या माश्या, चिलटे लगेच कमी होतील. (best home remedies to keep house flies and insects away from your house)

 

घरातल्या माश्या, चिलटं कमी करण्याचा उपाय

पावसाळ्यात घरात दिसून येणाऱ्या माश्या, चिलटं कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा एक व्हिडिओ kennybsimpson या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय अगदी सोपा असून यासाठी आपल्याला स्वयंपाक घरातले फक्त २ पदार्थ वापरायचे आहेत.

राहाने 'अशी' मुलगी होणं मला मान्यच नाही, आलिया भट सांगतेय तिच्यावर अपेक्षांचं ओझं असेल पण..

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात पहिले तर गॅसवर एका पातेल्यात साधारण ३०० मिली पाणी गरम करायला ठेवा. या पाण्यात २ टेबलस्पून लवंगा टाका.

 

लवंगा टाकल्यानंतर पाणी काही वेळ उकळू द्या. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्या पाण्याचा रंग हलकासा पिवळसर झाल्याचं दिसेल. जेव्हा अशा पद्धतीने पाण्याचा रंग बदलेल, तेव्हा त्या पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा टाका आणि गॅस बंद करा.

तुळस डेरेदार होतच नाही, पानंही हिरवीगार नसतात? किचनमधले २ पदार्थ वापरा- लगेच बहरून जाईल

सगळं पाणी एकदा व्यवस्थित हलवून घ्या. आणि बेकिंग सोड्यामुळे आलेला फेस कमी झाल्यावर ते पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. 

ओटा, डायनिंग टेबल, सिंक, बेसिन, फळं ठेवण्याची टोपली अशा ठिकाणी हे पाणी शिंपडून ती जागा पुसून घ्या. हा उपाय केल्यास घरातल्या माश्या, चिलटे तसेच डासदेखील कमी झाल्याचे जाणवेल.

  

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडी