Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात घरभर उडणाऱ्या माश्यांमुळे वैतागलात? ४  सोपे उपाय- एक माशी घरात दिसणार नाही

पावसाळ्यात घरभर उडणाऱ्या माश्यांमुळे वैतागलात? ४  सोपे उपाय- एक माशी घरात दिसणार नाही

How To Get Rid Of House Flies In Monsoon: पावसाळ्यात घरात माश्या होतातच. म्हणूनच त्यांना पळवून लावण्यासाठी  सोपे उपाय करून पाहा...(home remedies to make our house free from flies)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 02:17 PM2024-07-31T14:17:15+5:302024-07-31T16:12:56+5:30

How To Get Rid Of House Flies In Monsoon: पावसाळ्यात घरात माश्या होतातच. म्हणूनच त्यांना पळवून लावण्यासाठी  सोपे उपाय करून पाहा...(home remedies to make our house free from flies)

how to get rid of house flies in monsoon, home remedies to make our house free from flies, how to remove flies from house | पावसाळ्यात घरभर उडणाऱ्या माश्यांमुळे वैतागलात? ४  सोपे उपाय- एक माशी घरात दिसणार नाही

पावसाळ्यात घरभर उडणाऱ्या माश्यांमुळे वैतागलात? ४  सोपे उपाय- एक माशी घरात दिसणार नाही

पावसाळा जसा आल्हाददायक, सुखद वाटतो तसाच तो बऱ्याचदा कंटाळवाणा आणि खूप वैताग देणाराही ठरतो. कारण पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडे खूप चिकचिक असते, ओलसरपणा असतो. त्यामुळे मग घरभर चिलटं, माश्या, डास फिरत असतात. रोगराई पसरविणारे हे किटक घरात पाहिले की खूप अस्वस्थ होऊन जातं. डासांना पळवून लावण्यासाठी तरी वेगवेगळी साधनं आपण वापरू शकतो. पण चिलटं आणि माश्या यांच्यासाठी काय उपाय करावा ते कळत नाही (home remedies to make our house free from flies). तुमचीही अशीच अडचण झाली असेल तर हा एक उपाय करून पाहा (how to get rid of house flies in monsoon). यामुळे माश्या नक्कीच कमी झालेल्या दिसतील.(how to remove flies from house)

 

माश्यांना घरातून पळवून लावण्यासाठी उपाय

१. ओलसरपणामुळे घरात माश्या होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे घरात माश्या होऊ नयेत यासाठी स्वयंपाक घरात थोडी विशेष काळजी घ्या. स्वयंपाक घरात काही ओलं राहणार नाही, कुठे खरकटं सांडणार नाही, वेगवेगळी पदार्थ असणारी भांडी नेहमी झाकलेली असतील याची काळजी घ्या. 

टॉकीजमध्ये सिनेमा पाहताना खाता तसे चटपटीत मसाला कॉर्न घरी करायचे? बघा सोपी रेसिपी

२. तसेच ओला आणि सुका कचरा हे दोन्हीही झाकून ठेवा. त्यांच्या डस्टबिनची झाकणं अजिबात उघडी राहू देऊ नका.

 

३. घरातला पंखा मोठ्या स्पीडवर लावल्याने किंवा एसी लावून काही वेळासाठी घर एकदम थंड केल्यानेही माशा उडून जातात.

घरात कोणतीच भाजी नसेल तर २ टोमॅटो घेऊन ५ मिनिटांत करा चटपटीत चटणी, बघा सोपी रेसिपी

४. त्याचबरोबर एका भांड्यात गरम पाणी घ्या. त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडी मिरेपूड टाका. हे पाणी घरात जिथे सगळ्यात जास्त माश्या फिरतात, अशा ठिकाणी फवारा. माश्याचं प्रमाण बरंच कमी होईल.



 

Web Title: how to get rid of house flies in monsoon, home remedies to make our house free from flies, how to remove flies from house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.