Lokmat Sakhi >Social Viral > How to get rid of house lizards : खर्च फक्त १० रुपये, घरातील पालींना कायमचं पळवा; 5 सोपे उपाय, भिंतीवरच्या पाली गायब

How to get rid of house lizards : खर्च फक्त १० रुपये, घरातील पालींना कायमचं पळवा; 5 सोपे उपाय, भिंतीवरच्या पाली गायब

How to get rid of house lizards : पालींना घालवण्यासाठी लोक महागडी औषध विकत घेतात तर काहीजण झाडू किंवा चपलांच्या मदतीनं पालींना नष्ट करतात. (How to get rid of house lizards)

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 01:53 PM2022-05-10T13:53:19+5:302022-05-10T14:18:29+5:30

How to get rid of house lizards : पालींना घालवण्यासाठी लोक महागडी औषध विकत घेतात तर काहीजण झाडू किंवा चपलांच्या मदतीनं पालींना नष्ट करतात. (How to get rid of house lizards)

How to get rid of house lizards : Simple Tips to Remove Lizards From Your Home  | How to get rid of house lizards : खर्च फक्त १० रुपये, घरातील पालींना कायमचं पळवा; 5 सोपे उपाय, भिंतीवरच्या पाली गायब

How to get rid of house lizards : खर्च फक्त १० रुपये, घरातील पालींना कायमचं पळवा; 5 सोपे उपाय, भिंतीवरच्या पाली गायब

पाली कोणत्याही घरात मोठी समस्या बनू शकतात. स्वयंपाकघरात, देवघरात खूपदा पाली फिरताना दिसतात. त्यांची विष्ठा फरशीवर  पडलेली दिसते यामुळे अस्वच्छता पसरते. काहीजण घरात पाली दिसणं अशुभ मानतात. कारण काहीही असो, घरातील पाली,  किड्या मुंग्यांमुळे बराच त्रास जाणवतो. (How to get rid of house lizards) पालींना घालवण्यासाठी लोक महागडी औषध विकत घेतात तर काहीजण झाडू किंवा चपलांच्या मदतीनं पालींना नष्ट करतात. (Permanent Solutions For Your Lizard Problem) कमी वेळात फक्त १० रूपयांत तुम्ही घरापासून पालींना लांब ठेवू शकता. पालींना घालवण्याचे काही सोपे हॅक्स तुमचं काम अधिक सोपं करतील. (Simple Tips to Remove Lizards From Your Home)

१) अन्न उघडं ठेवू नका

उघड्यावरील अन्न हे पालींना आवडते आणि त्यांना घरात प्रजनन करण्यास मदत करते. उरलेले अन्न कधीही आजूबाजूला ठेवू नका. उरलेले अन्न माश्या आणि मुंग्यांना आकर्षित करते. म्हणून खरकटी भांडी, उष्टे अन्नपदार्थ कधीच बेसिनजवळ ठेवू नका. घरात जितकी स्वच्छता ठेवाल तितक्याच पाली, किटक घरापासून लांब राहतील.

२) काळी मिरी स्प्रे

यासाठी तुम्ही काळी मिरी किंवा पावडर वापरू शकता. फक्त एक चमचा काळी मिरी लागेल आणि ती तुमच्या घरात सहज उपलब्ध होईल. यासाठी तुमचा खर्च पूर्णपणे नगण्य असेल.  जर तुम्ही अख्खी काळी मिरी घेत असाल तर ठेचून घ्या आणि पावडर वापरत असाल तर त्याच प्रकारे पाण्यात मिसळा. रिकाम्या स्प्रे बाटलीत मिसळा. 1 दिवस असेच ठेवा आणि नंतर जिथे पाल दिसेल तिथे शिंपडा. त्यामुळे पालींचं घरात येण्याचं प्रमाण कमी होईल. 

शरीरसंबंधांपूर्वी गोळी घेतली, गर्भधारणेचं टेंशन नाही; शास्त्रज्ञांचा नव्या गर्भनिरोधक औषधाचा दावा

३) कांदा आणि लसूण

या पद्धतीमध्ये तुम्हालाही काही काळ कांदा आणि लसणाचा तीव्र वास सहन करावा लागेल. यासाठी तुम्हाला फक्त कच्च्या लसणाच्या काही कळ्या आणि चिरलेला कांदा ज्या ठिकाणी पाली असतील त्या ठिकाणी ठेवावे लागतील.  हे तुमच्यासाठी थोडे त्रासदायक ठरेल, पण यामुळे पालींना अधिक त्रास होईल. लसूण-कांदा देखील त्यांना अनेक दिवस घरापासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरेल.

४) मोर पीस

मोर पालींना खातात आणि त्यामुळे त्यांच्या पिसांच्या वासाने पाली पळून जातात. काहीजण असं मानतात की ही पद्धत जास्त काळ काम करत नाही. तरीही काहीवेळ पालींना दूर ठेवण्यासाठी ही तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. 

ब्लड प्रेशर सतत वाढतं? ५ बदल करा, बीपी नेहमी कंट्रोलमध्ये राहील, म्हातारे होईपर्यंत ठणठणीत राहाल

५) नेप्थलीन बॉल्स

नॅप्थलीन बॉल्सच्या पॅकेटची किंमत 50 ते 200 रुपये असू शकते, परंतु सरड्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला फक्त 1-2 बॉल्स लागतील. त्यामुळे तुमचे काम 10 रुपयांत होईल. तुम्हाला फक्त ते तुमच्या घराच्या कोपऱ्यात ठेवावे लागेल. पाली जिथून येतात तिथे  जास्त ठेवा.  पाली घरातील ओलसर आणि उबदार ठिकाणी सहज प्रजनन करू शकतात जसे की हवेच्या छिद्रांखाली, स्वयंपाकघरातील सिंक, कपाट इ. त्यांच्यासाठी ही योग्य ठिकाणे आहेत. म्हणून अशी ठिकाणी नेहमी स्वच्छ करत राहा.
 

Web Title: How to get rid of house lizards : Simple Tips to Remove Lizards From Your Home 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.