उंदीर हे घरात बिन बुलाये मेहमान या ओळीला साजेसे असे कधीही घुसून येतात (Cleaning Tips). उंदीर घरात शिरल्याने सगळ्यांनाच भीती वाटते. उंदरांच्या धुडगुसीमुळे घरातील वस्तुंचे नुकसान होतेच (Mice). शिवाय त्यांच्या विष्टेमुळे एक विचित्र प्रकारचा वास येऊ लागतो. तसेच यामुळे रोगराई देखील पसरते (Rats).
अशावेळी मग शेवटी उंदरांना मारण्याचं औषध घालण्याशिवाय लोकांकडे कोणताच पर्याय उरत नाही. पण उंदरांवर केमिकल रसायनयुक्त वस्तूंचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपाय करून पाहा. न मारताही उंदीर घरातून पळ काढतील. यासाठी आपण १० रुपयाच्या तुरटीचा वापर करून पाहू शकता. पण तुरटीचा नेमका वापर कसा करावा? पाहा(How to Get Rid of House Mice).
उंदीर तुरटीला का घाबरतात?
उंदरांना तुरटीचा तिखट वास आणि चव अजिबात आवडत नाही. त्यामुळे रस्त्यावर तुरटी दिसल्यास उंदीर आपला मार्ग बदलतात. त्यामुळे उंदरांना पळवून लावण्यासाठी तुरटीचा वापर करून पाहा.
ना गॅस - ना तेल, लालचुटूक बीटाची करा झणझणीत चटणी; वाढेल हिमोग्लोबिन - खा पोटभर
तुरटी पावडर
घरातून उंदरांना पळवून लावण्यासाठी तुरटीचा सोपा उपाय करून पाहा. यासाठी बाजारातून १० रुपयाची तुरटी विकत घ्या, त्याची पावडर तयार करा. तयार तुरटीची पावडर घराच्या दाराजवळ शिंपडा. ज्या ठिकाणाहून उंदीर फिरला असेल, त्या ठिकाणाहून तुरटी पावडर शिंपडा. यामुळे उंदीर घरात शिरणार नाही, आणि घरी शिरलेला उंदीर घराबाहेर पळ काढेल.
नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी मध - लिंबाच्या रसाचा सोपा उपाय; चेहरा होईल क्लिअर
तुरटीचा स्प्रे
उंदरांची दहशत कमी करण्यासाठी आपण तुरटीचा स्प्रे तयार करू शकता. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा, त्यात तुरटी पावडर भरून मिक्स करा, आणि तयार पाणी जिथे उंदीर दिसेल तिथे शिंपडा. या युक्तीमुळे काही मिनिटात उंदीर घरातून पळ काढतील.