आपण कितीही घर सावरण्याचा प्रयत्न केलं तरी, कोणत्यातरी कोपऱ्यात धूळ असतेच (Cleaning Tips). आजकालच्या धकाधकीच्या जीवनात घर स्वच्छ ठेवणे सोपी गोष्ट नाही (How to get rid of Lizards). घर स्वच्छ नसेल तर घरात पाल, मच्छर आणि झुरळांचा वावर हा होतोच. घरात पालीने प्रवेश केला तर ती लवकर घर सोडूनही जात नाही. पालींची पिल्ली देखील घरभर फिरतात.
जर किचनमध्ये पालींचा वावर वाढला तर, स्वयंपाक घरात तयार केलेल्या अन्नातून आपल्याला विषबाधा होऊ शकते. त्यामुळे वेळीच पालींना पळवून लावून देणं गरजेचं आहे. पालींना घरातून पळवून लावण्यासाठी कोणते उपाय फायदेशीर ठरते? कोणत्या उपायांमुळे पाली घर सोडून पळतील? पाहूयात(How to get rid of lizards at home: Check here).
पालींना पळवून लावणारा एक घरगुती स्प्रे
लिक्विड स्प्रे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
कांदा
लसूण
काळी मिरी पूड
अंगात रक्त कमी झालं हे कसं ओळखाल? हिमोग्लोबीन वाढवणारे ४ पदार्थ; अशक्तपणा होईल दूर
लिंबाचा रस
पाणी
अशा पद्धतीने तयार करा पालींना पळवून लावणारं स्प्रे
मिक्सरच्या भांड्यात १ बारीक चिरलेला कांदा आणि ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट तयार केल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.
शिळ्या चपातीचा करा १० मिनिटात चमचमीत चिवडा, उरलेल्या पोळ्यांचं करु काय? -प्रश्नच विसरा..
नंतर पेस्टमध्ये एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा काळी मिरी पूड आणि एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर त्यात अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करा. आता एका ग्लासवर चहाची गाळणी ठेवा. त्यावर मिश्रण ओतून पाणी वेगळं करा.
तयार पालींना पळवून लावणारं लिक्विड एका बॉटलमध्ये भरून घ्या, आणि ज्या ठिकाणी पालींचा जास्त वावर आहे, त्या ठिकाणी स्प्रे करा. कांदा, लसूण आणि काळी मिरी पावडरचा उग्र गंध पालींना आवडत नाही. ज्यामुळे पाली पुन्हा त्या जागेवर फिरकणार नाही. शिवाय घर सोडून पळ काढतील.