Lokmat Sakhi >Social Viral > किचनमध्ये पालींचा सुळसुळाट झाला? कांद्याच्या सालीचा १ उपाय-पालींचा त्रास कायमचा टळेल

किचनमध्ये पालींचा सुळसुळाट झाला? कांद्याच्या सालीचा १ उपाय-पालींचा त्रास कायमचा टळेल

How To Get Rid Of Lizards At Home : पाळींना पळवून लावण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. ज्यासाठी तुम्हाला जराही खर्च करावा लागणार नाही. (Easy Ways to Remove Lizards Permanently)

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 02:09 PM2023-10-05T14:09:56+5:302023-10-05T16:41:05+5:30

How To Get Rid Of Lizards At Home : पाळींना पळवून लावण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. ज्यासाठी तुम्हाला जराही खर्च करावा लागणार नाही. (Easy Ways to Remove Lizards Permanently)

How To Get Rid Of Lizards At Home : Easy Ways to Remove Lizards Permanently | किचनमध्ये पालींचा सुळसुळाट झाला? कांद्याच्या सालीचा १ उपाय-पालींचा त्रास कायमचा टळेल

किचनमध्ये पालींचा सुळसुळाट झाला? कांद्याच्या सालीचा १ उपाय-पालींचा त्रास कायमचा टळेल

घराच्या भिंतीवर, देवाऱ्याजवळ पाली भरपूर फिरतात. पाली किचनमध्ये जास्त दिसून येतात.  पालींच्या लहान लहान पिल्लांचा सुद्धा घरात सुळसुळाट झालेला असतो. अशावेळी पालींना दूर पळवण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रे वापरण्याशिवाय पर्याय नसतो. पाळींना पळवून लावण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. ज्यासाठी तुम्हाला जराही खर्च करावा लागणार नाही. (Easy Ways to Remove Lizards Permanently)

पालींना पळवून लावण्यासाठी सगळ्यात आधी मिरच्यांचे देठ काढून घ्या. कांद्याचे मागचे आणि पुढचे टोक काढून  कांद्याची सालं काढून घ्या. एका भांड्यात मिरच्यांचे देठ, कांद्याची सालं, लिंबाचे साल काढून घ्या. त्यात दोन ते तीन कापूर घाला. पाणी घालून व्यवस्थित उकळून द्या. (Pal kashi maravi)उकळ फुटल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. पाण्याचा रंग बदललेला दिसून येईल. गॅस बंद करून  हे पाणी गाळून घ्या. (How To Get Rid Of Lizards At Home) 

गाळणीत जमा झालेला सालींचा कचरा बाजूला काढून ठेवा. तुम्ही जे साहित्य हे पाणी बनवण्यासाठी वापरलं त्याचा वास पाण्याला येईल. हे पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्य भरा, घरात ज्या ज्या ठिकाणी पाली येतात. ज्या ठिकाणी म्हणजेच भितींवर, कोपऱ्यावर या मिश्रणाने स्प्रे करा. या स्प्रेच्या वासाने पाली दूर पळण्यास मदत होईल. (Easy Ways to Remove Lizards From Your Home Permanently)

१) लाल मिरी, काळी मिरीचे पाणी घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांवर, खिडकी, दरवाज्यांवर स्प्रे केल्यास पाली दूर पळतील. हे पाणी  शरीर आणि डोळ्यांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या.

२) पालींना घालवण्यासाठी तुम्ही कॉफी पावडरचा वापर करू शकता. कॉफी पावडरमध्ये तंबाखू मिसळून याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवा. ज्या ठिकाणी पाली जास्त येतात त्या ठिकाणी ठेवा. 

३) थंड पाणी पालींना दूर पळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पाली दिसल्यानंतर तुम्ही त्यावर तुम्ही थंड पाणी घालू शकता. यामुळे पाली घरात येणार नाहीत.

४) पाली दूर करण्यासाटी नेप्थलीनच्या गोळ्या उत्तम पर्याय आहे.  पाली सगळ्यात जास्त ज्या ठिकाणी येतात तिथे या गोळ्या ठेवा. यामुळे पाली दूर होण्यास मदत होईल.

रात्रीच्या जेवणात चपाती खावी की भात? वजन कमी करण्यासाठी काय उत्तम, तज्ज्ञ सांगतात...

५) लसूण आणि कांद्याचा वास तीव्र असतो ज्यामुळे पाली दूर पळवण्यास मदत होतो. यामुळे पालींना कोणताही त्रास होत नाही. फक्त पाली वासाने दूर पळतात. 

Web Title: How To Get Rid Of Lizards At Home : Easy Ways to Remove Lizards Permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.