Lokmat Sakhi >Social Viral > घरातल्या भिंतीवर पाली आणि त्यांची पिल्लं फिरतात? ५ उपाय, घरात एकही पाल दिसणार नाही

घरातल्या भिंतीवर पाली आणि त्यांची पिल्लं फिरतात? ५ उपाय, घरात एकही पाल दिसणार नाही

How to Get rid of Lizards at Home (Pali ghalvnyache upay sanga) : पाली पळवण्यासाठी सोपे उपाय करून तुम्ही  पालींना  कायमचे दूर पळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 03:06 PM2023-11-27T15:06:07+5:302023-11-27T15:07:38+5:30

How to Get rid of Lizards at Home (Pali ghalvnyache upay sanga) : पाली पळवण्यासाठी सोपे उपाय करून तुम्ही  पालींना  कायमचे दूर पळवू शकता.

How to Get rid of Lizards at Home Naturally : Effective Ways That Show How to Get Rid of Lizards | घरातल्या भिंतीवर पाली आणि त्यांची पिल्लं फिरतात? ५ उपाय, घरात एकही पाल दिसणार नाही

घरातल्या भिंतीवर पाली आणि त्यांची पिल्लं फिरतात? ५ उपाय, घरात एकही पाल दिसणार नाही

आपलं घर स्वच्छ नीटनेटकं दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. घरात किटक, पालींचा वावर वाढला की घर अस्वछ होते आणि आजार पसरण्याचाही धोका असतो. भितींवर,लिव्हिंग रूम, ट्यूब लाईटच्या मागे लहान मोठ्या पाली फिरत असतात. (How to Get rid of Lizards at Home Naturally) यासाठी तुम्ही केमिकल्सयुक्त स्प्रे न वापरता सोपे उपाय करू शकता.

पाली पळवण्यासाठी सोपे उपाय करून तुम्ही  पालींना  कायमचे दूर पळवू शकता. (pali palvnyache upay in marathi) घरात किटक येऊ नयेत यासाठी लादी पुसण्याच्या पाण्यात फिलाईन आणि कडुलिंबाची पानं घाला. यामुळे फरशी स्वच्छ राहील. देव्हाऱ्याजवळ, अन्नपदार्थांजवळ पाली फिरतात. यामुळे इन्फेक्शन पसरण्याचाही धोका असतो. (How To Get Rid of Lizards)

१) नेप्थलीन

पालींना पळवण्यासाठी नेप्थलीनच्या गोळ्या प्रभावी ठरतात. यासाठी तुम्हाला जास्त काही करावं  लाहत नाही. फक्त या गोळ्या घरात ज्या ठिकाणी पाली फिरतात तिथे ठेवून द्या. याचा वास पालींना अजिबात आवडत नाही. यामुळे पाली दूर पळतात.

१ कप डाळ-तांदूळाचा करा मऊ, जाळीदार खमन ढोकळा; मार्केटसारखा परफेक्ट ढोकळा बनेल घरीच

२) लाल मिरच्या 

पालींना पळवण्यासाठी तुम्ही लाल मिरचीच्यांचाही वापर करू शकता. यासाठी लाल मिरची पाण्यात मिसळून याची पावडर संपूर्ण घरात शिंपडा. असं केल्याने पाली घरातून दूर पळतील. हे पाणी डोळ्यात शिरणार नाही याची काळजी घ्या. 

३) कॉफी 

कॉफीचा स्मेल पालींना अजिबात आवडत नाही. तुम्ही कॉफीमध्ये तंबाखू पावडर मिसळून ज्या ठिकाणी पाली जास्त येतात त्या ठिकाणी लावू शकता.  कॉफीच्या सुंगधामुळे पाली दूर होण्यास मदत होते. 

शाहरूखनं सांगितलं बाऊंसी-दाट केसांचं सिक्रेट; काळ्या केसांसाठी वापरतो किचनमधले हे ३ पदार्थ

४) अंड्याची सालं

अंड्याची सालीने पालींना एलर्जी होते. अशावेळी तुम्ही अंड्याच्या सुकलेल्या साली तोडून घराच्या अशा ठिकाणी ठेवा. ज्या ठिकाणी पाली जास्त येतात. अंड्याच्या सालीच्या वासाने पाली दूर पळतील.

५) लसूण आणि कांदा

घराचे दरवाजे आणि खिडक्या  या ठिकाणी लसणाच्या कळ्या लटकून ठेवा. लसूण आणि कांद्याचा रस काढून त्यात पाणी मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि घरात शिंपडा.  या उपायाने घरात एकही पाल येणार नाही.

Web Title: How to Get rid of Lizards at Home Naturally : Effective Ways That Show How to Get Rid of Lizards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.