Join us  

घरात पालींचा सुळसुळाट झालाय? ४ सोपे उपाय; पाल- बारीक किडे आसपासही येणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 1:29 PM

How to Get Rid of Lizards at Home : घरातल्या पालींना पळवण्यासाठी अंड्याचे साल फायदेशीर ठरू सकते.  पाली अंड्याच्या सालीच्या वासानं दूर पळतात.

कितीही साफ-सफाई केली तरी घरात पाली आणि झुरळं येणं काही थांबत नाही. (Cleaning Hacks) खासकरून स्वंयपाकघरात पालींचा वावर जास्त असतो. घरात  शिरलेल्या पालींना बाहेर घालवणं खूपच कठीण काम. याव्यतिरिक्त उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या दिवसातही पाली घरात जास्त प्रमाणात  दिसतात. (How to get rid of lizards at home)

पालींचा वावर वाढल्यानं खाण्यापिण्याचे पदार्थ इन्फेक्टेड होण्याची शक्यता असते. काही घरगुती उपाय पालींना पळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पालींना पाहिल्यानंतर लहान मुलं घाबरतात तर कधी किळस वाटते. (Home Remedies on How to Get Rid of Lizards Effectively)

कांद्याचं साल

पालींना दूर पळवण्यासाठी सगळ्यात आधी कांद्याचे साल काढून  घ्या. नंतर सुई धाग्याच्या मदतीनं लिंबू मिरचीप्रमाणे कांद्याच्या साली धाग्यात बांधा.  स्वयंपाकघरातील अशा ठिकाणी ठेवा जिथे पाली भरपूर येतात. कांद्याच्या सालीच्या वासानं पाली दूर पळतात. (Simple ways to remove lizards from your home permanently)

किचनमधल्या पालींना पळवण्यासाठी होममेड  स्प्रे तयार करा आणि दिवसातून ३ ते ४ वेळा घरात ज्या ठिकाणी पाली येतात अशा ठिकाणांवर स्प्रे करा.  कांदा आणि लसणाचा रस घ्या. डेटॉल लिक्विड किंवा साबण बारीक किसून घ्या. त्यात बारीक केलेली लवंग पावडर घाला. हे मिश्रण किचनमध्ये ३ ते ४ वेळा स्प्रेनं संपूर्ण घरात फवारा. कांदा, लसूण, लवंग आणि डेटॉल साबणाचा सुगंध इतका तीव्र असतो की त्याच्या वासानं पाली दूर पळतात. 

अंड्याचे साल

घरातल्या पालींना पळवण्यासाठी अंड्याचे साल फायदेशीर ठरू सकते.  पाली अंड्याच्या सालीच्या वासानं दूर पळतात.  पाली घरात जास्त झाल्या असतील तर काही दिवसातच कोपऱ्यांमध्ये अंड्याच्या साली ठेवा. यामुळे पाली घराबाहेर राहण्यास मदत होईल. 

नेफ्थलीनच्या गोळ्या

कपड्यांमधील किटक दूर ठेवण्यासाठी नेफ्थलीनच्या गोळ्यांचा वापर तुम्ही करू शकतात. देव्हाऱ्याजवळ, कपाटात, किचनच्या कोपऱ्यात, चपलांच्या स्टॅण्डजवळ तुम्ही हे नेफ्थलीन बॉल्स ठेवू शकता. यामुळे पालींचा वावर कमी होईल. 

मोरपिस

मोरपिस घराचं सौदर्यं वाढवण्यासाठी घरात ठेवले जाते. घरातील पालींना पळवण्यासाठी तुम्ही मोराच्या पीसांचा वापर करू शकता. मोराच्या पिसांना पाहून पाली दूर पळतात. हा उपाय ट्राय केल्यास कोणताही उपाय न करता घरातील पाली दूर होण्यास मदत होईल. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स