Join us  

पाली ठोकतील धूम, फक्त करा ३ सोपे घरगुती उपाय- घरात एकही पाल फिरकणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 10:10 AM

How to Get Rid of Lizards at Home Without Killing Them-3 Tips : केमिकल महागडे उत्पादने कशाला? घराच्या कोपऱ्यात ठेवा ३ गोष्टी-पाल गायब

प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी पाल आली असेल. घरात पाल शिरताच बरेच जण घाबरून जातात. घरातून पाल पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. पण घरातून पाल बाहेर पडेलच असे नाही. बऱ्याचदा पाल दिसताच आपण पळवून लावण्याच्या मागे लागतो (Social Viral). पालींना पळवून लावण्यासाठी आपण केमिकल उत्पादनांचा वापर करतो. पण केमिकल उत्पादन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण काही घरगुती उपायांना देखील फॉलो करू शकता (lizard). या उपायांमुळे केमिकलचा त्रास आरोग्याला होणार नाही, शिवाय याच्या वापराने पाली धूम ठोकत पळ काढतील(How to Get Rid of Lizards at Home Without Killing Them-3 Tips).

पालींना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय

लसूण

जर घरात पालींचा वावर वाढत चालला असेल तर, काही घरगुती उपायांनी त्यांना पळवून लावू शकता. यासाठी लसणाचा वापर आपण करून पाहू शकता. ज्या ठिकाणी पाली जास्त प्रमाणात फिरतात, त्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या किंवा लसणाचा स्प्रे तयार करून त्या ठिकाणी शिंपडा. लसणाच्या उग्र गंधामुळे पाली घराबाहेर पडतील.

हृदयद्रावक! पाळणा समजून आईनेच पोटच्या गोळ्याला ठेवले चालू ओव्हनमध्ये, काही वेळानंतर..

काळी मिरीचं पाणी

काळ्या मिरीची पावडर भिंतीवर शिंपडल्यास पाली पुन्हा घरात फिरकणार नाही. शिवाय पाण्यात काळी मिरीची पावडर मिक्स करून भिंतीवर स्प्रे केल्यानेही पाली त्याच ठिकाणी पुन्हा फिरकणार नाही.

'ऐसा लग रहा है, मै जन्नत के बिचोंबीच खडी हूं!' - पाहा काश्मिरी मुलींचे सुंदर निरागस रिपोर्टिंग

कॉफी पावडर

पाली बऱ्याचदा एकाच ठिकाणी वारंवार फिरतात. त्यांना पळवून लावण्यासाठी आपण कॉफी पावडरचा देखील वापर करू शकता. कॉफी पावडरमध्ये तंबाखू मिसळून जिथे पाल येतात त्या ठिकाणी ठेवा. यामुळे पाल पुन्हा येणार नाही.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया