Join us  

पालींचा घरभर उच्छाद? कांद्याचा करा 'असा' वापर; घरातल्या पाली होतील गायब-डोक्याचा ताप कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 5:11 PM

How to Get Rid of Lizards at Home Without Killing Them? Onion Trick for this : पालींना घरातून पळवून लावणारा १ घरगुती उपाय; पाली मारण्याची कटकट नाही

प्रत्येकाच्या घरात पालींचा (Lizard) धुमाकूळ पाहायला मिळतो (Lizard). पालींमुळे घर अस्वच्छ होते. घराची साफ सफाई करताना पाली सैरावैरा पाळतात. पालींना मारण्याची इच्छा होत नाही (Social Viral). पालींना वेळीच पळवून लावलं नाहीतर, ते घरभर फिरतात. किचनमध्ये पाली शिरल्यानंतर पदार्थ आणि भांडयांवरूनही फिरतात (Cleaning Tips). ज्यामुळे आपल्याला फूड पॉयझन होण्याचीही शक्यता निर्माण होते.

दिवाळीची साफ सफाई करताना पालींना पळवून लावायचं असेल तर, काही घरगुती टिप्स फॉलो करून पाहा. या काही टिप्समुळे केमिकल रसायनयुक्त उत्पादनांचा वापर न करता, पाली घरातून पळ काढतील. शिवाय घर स्वच्छ होईल. पालींना पळवण्यासाठी कोणते टिप्स उपयुक्त ठरतील(How to Get Rid of Lizards at Home Without Killing Them? Onion Trick for this).

पालींना पळवून लावण्यासाठी काही टिप्स

कांदा

कांद्याचा वापर फक्त फोडणीसाठी नसून याच्या वापराने आपण पालींनाही पळवून लावू शकता. पालींना कांद्याचा उग्र वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे पाली त्या जागेवरून पळ काढतात. यासाठी कांद्याचे तुकडे करा. कांद्याचे काही फोड धाग्याला बांधून एका जागेवर लटकवा.

सराफाकडे न जाता सोन्याचे दागिने चमकतील; फक्त बेकिंग सोड्याचा 'असा' वापर करा; मिनिटात दागिने स्वच्छ

हवं असल्यास आपण होममेड स्प्रेही तयार करू शकता. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये कांदा, लसणाचा रस, डेटॉल आणि लवंग पावडर घालून मिक्स करा. त्यात थोडे पाणीही घाला. तयार स्प्रे आपण ज्या ठिकाणी पाली फिरतात, त्या ठिकाणी स्प्रे करू शकता.

तुम्हाला माहितीच नसतील बदामांच्या सालांचे ४ उपाय, केस दाट-दातांचा पिवळेपणा गायब आणि..

काळी मिरी पावडर

काळी मिरी पावडरच्या गंधानेही पाली घर सोडून पळ काढतील. काळी मिरीचा उग्र गंध पालींना आवडत नाही. आपण स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करू शकता. तयार स्प्रे ज्या ठिकाणी पालींचा जास्त वावर आहे, त्या ठिकाणी स्प्रे करा. मिनिटात पाली गायब होतील. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सदिवाळी 2023सोशल व्हायरल