Join us

ना जास्त खर्च, ना केमिकलचा वापर...या नॅचरल उपायांनी घरातून पळून जातील पाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:19 IST

Lizard Free trick : पालीच्या विष्ठेमध्ये आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया आढळतात. ज्यामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकतं. त्यामुळे पाली घरातून पळवणं गरजेचं असतं.

Lizard Free trick : उन्हाळा सुरू होताच लोक डासांमुळे हैराण होतात. डासांसोबतच या दिवसांमध्ये घराच्या भींतीवर आणि कानाकोपऱ्यात पालीही फिरत असतात. लहान असो वा मोठे सगळ्यांनाच पालीची भीती वाटते. जर पाल किचनमध्ये ठेवलेल्या पदार्थांवर, पालेभाज्यांवर गेली तर डोकेदुखी आणखी वाढते. कारण पालीच्या विष्ठेमध्ये आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया आढळतात. ज्यामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकतं. त्यामुळे पाली घरातून पळवणं गरजेचं असतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पाली घरातून पळवून कशा लावायच्या. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

कशा पळवाल पाली?

- घरात पालींचा सुळसुळात झाला असेल तर त्यांना पळवण्यासाठी काळी मिरी खूप फायदेशीर ठरते. यासाठी काळी मिरीच्या पाण्याचा स्प्रे पाली येत असलेल्या ठिकाणांवर करा. काळी मिरीच्या गंधानं पाली घरातून पळून जातील.

- पालींना कांद्याचा गंधही आवडत नाही. त्यामुळे याचाही वापर तुम्ही पाली पळवून लावण्यासाठी करू शकता. यासाठी कांदे आणि लसणाचा स्प्रे तयार करा आणि घरातील कानाकोपऱ्या मारा.

- नेफथलीनच्या गोळ्याही घरातील पाली बाहेर पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतात. फक्त या गोळ्यांचा वापर करत असताना लहान मुलांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या.

- तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अंड्याचं टरफलही पाली पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरते. घराच्या कानाकोपऱ्यात अंड्याचं टरफल ठेवलं तर पाली तिथे येणार नाही. 

- तसेच लिंबू आणि पदीन्या रस एकत्र करून पाली येतात त्या ठिकाणी शिंपडा. हा उपायही पालींना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतो.

- कापराचा वापर तुम्ही देवासमोर करत असालच, कापराचं पाणी हे पालींना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

- त्यासोबतच तुळशीची पानं चिरडून ती घरातील कानाकोपऱ्यात ठेवा. तुळशीच्या गर्द गंधामुळेही पाली घरातून पळून जातील.

टॅग्स :सोशल व्हायरलआरोग्य