प्रत्येक ऋतूत घरात डास येण्याचा त्रास छळतो. डास चावू लागले की कामाकडे व्यवस्थित लक्ष राहत नाही. त्वचेवर खाज आल्याने पूर्ण लक्ष तिकडेच असतं. जर रात्री झोपेत असताना डास चावले तर झोप मोड होते. (Mosquitoes Controlling at Home) डासांना पळवून लावण्यासाठी नेहमीच केमिकल्सयुक्त कॉईल किंवा स्प्रेचा वापर केला जातो.
त्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही डासांना कायमचं दूर पळवू शकता. डास घरात येऊ नयेत म्हणून कोणते उपाय करता येतील ते पाहूया. (How to get rid of mosquitoes at home) डास नको असतील तर फरशी पुसताना पाण्यात कडुलिंबाची पानं, फिनाईल घालून पुसा. यामुळे घर स्वच्छ राहील आणि किटकही येणार नाहीत. (Easy ways to get rid of mosquitoes inside the house)
१) एका भांड्यात शेणाच्या वड्या (काऊ डंग केक्स) कापूर, जाळून ते २ मिनिटांनी विझवा. त्यात लवंग, दालिचनी घाला याचा धूर पूर्ण घरात पसरवा. याच्या वासाने डास दूर पळतील.
२) लसूण डास पळवण्याचा एक सोपा उपाय आहे. लसणाच्या २ ते ४ पाकळ्या हलक्या सोलून १ ग्लास उकळत्या पाण्यात घाला. त्यानंतर पाणी थंड करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. डास ज्यावेळी घरात येतात तेव्हा हे पाणी संपूर्ण घरात शिंपडा. यामुळे डास दूर पळण्यास मदत होईल.
३) सोयाबीनचे तेल सुद्धा डासांना दूर घालवते. यासाठी ५ ते ७ कापसाच्या बोळ्यांना सोयाबीनचं तेल लावून घ्या त्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हे बोळे ठेवा. हा उपाय केल्यानं डास आसपासही फिरकणार नाहीत.
तांब्या पितळाची भांडी चुटकीसरशी चकाचक होतील; ४ ट्रिक्स, नवी कोरी दिसतील पुजेची भांडी
४) कडुलिंबाचे तेल घरात शिंपडून तुम्ही डासांना दूर ठेवू शकता. कडुलिंबाचे तेल तुम्ही अंगावरही लावू शकता किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून डास जिथे जास्त दिसतात अशा ठिकाणी हे तेल शिंपडा. या उपायानं डासांचा वावर कमी होईल.
पंख्यावर धूळ साचलीये? हात न लावता स्वच्छ करा पंखा; 3 टिप्स, टेबल-खुर्ची न वापरता होईल स्वच्छ
५) डासांना पुदिन्याचा वास अजिबात अजिबात आवडत नाही. पुदिन्याचं तेल संपूर्ण घरात शिंपडा. तुम्ही हवंतर पुदिन्याची पानं घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता. यामुळे डास कमी होण्यास मदत होईल.