Join us  

पावसाळ्यात डासांच्या त्रासाने झोप उडाली? बेकिंग सोड्याचा करा ‘असा’ वापर, डासांचा ताप कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2024 4:13 PM

How to get rid of mosquitoes during the rainy season : डासांना पळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय, केमिकल उत्पादनांपेक्षा बेस्ट

पाऊस सुरु होताच, डासांची देखील दहशत पाहायला मिळते (Mosquitoes). या दिवसात डासांचा वावर जास्त वाढतो. ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारखे धोकादायक आजारांचा धोका वाढतो (Monsoon Season). संसर्गाची भीती टाळण्यासाठी प्रत्येक घरातील लोक वेगवेगळे उपाय करत असतात (Health Care).

डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बाजारात मिळणारे रासायनिक उत्पादने खरेदी करतात. पण हे प्रॉडक्ट्स आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. विशेष म्हणजे त्यातील घटक मुलांच्या आरोग्याला हानी पोहचवू शकतात. जर आपल्याला केमिकल उत्पादनांचा वापर करायचं नसेल तर, विक्स व्हेपोरबचा यापद्धतीने वापर करून पाहा. यामुळे फक्त डास घरभर सुगंध पसरेल(How to get rid of mosquitoes during the rainy season).

घरातून डास पळवणारे उपाय

लागणारं साहित्य

- विक्स व्हेपोरब

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका

- बेकिंग पावडर

- पाणी

तयार करण्याची पद्धत

सर्वात आधी, एक बाऊल घ्या. त्यात एक चमचा विक्स व्हेपोरब काढून घ्या. त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा कप गरम पाणी मिसळा. अशा प्रकारे डासांना दूर करणारे लिक्विड तयार.

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका

डास दूर करणारे मशीन जर आपण वापरत असाल तर, रिकामा बॉक्स घ्या. त्याच्या कंटेनर बॉक्समध्ये लिक्विड भरा.  त्याचे झाकण व्यवस्थित लावून बंद करा. आपण ज्या पद्धतीने डास पळवणारे मशीनचा वापर करतो, त्याच प्रमाणे करा. या उपायामुळे डास दूर पळून जातील.

- स्विच चालू करताच विक्सचा सुगंध घरात पसरेल आणि डास दूरवर दिसणार नाहीत. जर आपल्याकडे विक्स व्हेपोरब नसेल तर, पुदिन्याचे तेल किंवा निलगिरीच्या तेलाचा वापर करा. याच्या उग्र गंधामुळे डास पळून जातील. 

टॅग्स :मोसमी पाऊसहेल्थ टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया