हिवाळा, पावसाळा या दिवसांत डासांचे आणि डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण खूप वाढलेले असते. त्यामुळेच सध्या अनेक भागात चिकनगुनियाचे रुग्ण वाढलेले दिसतात (simple tricks and tips to keep our house mosquito free). वाढत्या डासांपासून कुटूंबाचे संरक्षण करण्यासाठी आपण विकत मिळणारे लिक्विड घरात लावून ठेवतो. पण त्यामुळे अनेक जणांना श्वास घेण्यास त्रास होतो. काही जणांना त्या वासामुळे सर्दी होते, नाक चोंदल्यासारखं होतं. शिवाय डास चावू नयेत म्हणून अंगाला लावण्याचं जे क्रिम मिळतं, ते ही सगळ्यांच्याच त्वचेला सहन होईल, असं नाही. म्हणूनच आता काही घरगुती पदार्थ वापरून डासांना कसं पळवून लावायचं ते पाहा (how to get rid of mosquitos?). हे उपाय केल्याने डास तर पळून जातीलच पण घरातही एक मंद सुगंध दरवळत राहील.(how to keep mosquito away from our house?)
डासांना पळवून लावण्याचे नैसर्गिक उपाय
१. लिंबाचे दिवे
डासांना पळवून लावण्याचा हा एक सोपा उपाय आहे. यामुळे डास तर निघून जातीलच पण घरातही एक प्रकारचा मस्त लिंबाचा सुवास दरवळेल. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एक लिंबू घ्या आणि ते मधोमध कापा. आता त्या लिंबातला गर चाकूने अलगदपणे काढून टाका.
आता त्याचा आकार एखाद्या छोट्या वाटीसारखा झाला असेल. त्यामध्ये आता थोडं मोहरीचं तेल टाका. कापूर हाताने चुरून टाका आणि लवंग थोडी बारीक करून टाका. असे ४ ते ५ दिवे करून घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये लावा. कापूर, लवंग आणि मोहरीच्या तेलाच्या सुगंधाने डास पळून जातील.
२. टुथपेस्टची कमाल
हा उपाय करण्यासाठी एक पेपर नॅपकीन घ्या. त्यावर साधारण अर्धा चमचा कॉफी पावडर आणि थोडी लवंग पावडर, थोडा कापूर टाका.
चंपाषष्ठी नैवेद्य: अस्सल गावरान पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत आणि भाकरी, या जेवणाची सर कशाला नाही..
त्या पेपरच्या एका बाजुुने टुथपेस्ट लावा आणि त्याची गुंडाळी करा. ही गुंडाळी वातीप्रमाणे लावून त्याचा धूर घरभर फिरवा. यामुळेही घरातले डास लगेच निघून जातील.