Lokmat Sakhi >Social Viral > भींतीना पडलेले बुरशीचे डाग निघतील चटकन, ‘ही’ पांढरी पावडर घ्या-उपाय असा भारी की भिंती चकाचक

भींतीना पडलेले बुरशीचे डाग निघतील चटकन, ‘ही’ पांढरी पावडर घ्या-उपाय असा भारी की भिंती चकाचक

How to Get Rid of Mould and Mildew on Walls : भिंतीवरील बुरशीचे काळे डाग कसे स्वच्छ करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 05:46 PM2024-10-16T17:46:16+5:302024-10-16T17:47:17+5:30

How to Get Rid of Mould and Mildew on Walls : भिंतीवरील बुरशीचे काळे डाग कसे स्वच्छ करायचे?

How to Get Rid of Mould and Mildew on Walls | भींतीना पडलेले बुरशीचे डाग निघतील चटकन, ‘ही’ पांढरी पावडर घ्या-उपाय असा भारी की भिंती चकाचक

भींतीना पडलेले बुरशीचे डाग निघतील चटकन, ‘ही’ पांढरी पावडर घ्या-उपाय असा भारी की भिंती चकाचक

घराची साफसफाई (Cleaning Tips) काही जण महिन्याला तर काही जण आठवड्याला करतात (Diwali Cleaning). पण दिवाळीला संपूर्ण घराची साफसफाई केली जाते (Wall Cleaning). बऱ्याचदा साफसफाई करूनही घराच्या कोपऱ्यांमध्ये धूळ आणि माती तशीच राहते. शिवाय पावसाळ्यामुळे भिंतींनाही बुरशीही लागते. जी सहसा घासूनही निघत नाही. भिंत घासल्यानंतर बुरशी तर निघेल, पण भिंतीची चमक कमी होऊ शकते.

खिडक्या आणि दारांच्या कोपऱ्यात घाण जमा होते. भिंतींवरील बुरशी काढताना अनेकदा रंगही निघण्याची शक्यता असते. भिंतींवरचा रंग निघाल्यावर घराची शोभाही काहीशी कमी होते. घराचे कोपरे जर बुरशीमुळे घाण झाले असतील तर, काही गोष्टी फॉलो करून पाहा. या घरगुती टिप्समुळे मिनिटात भिंतींवरचे डाग गायब होतील. शिवाय भिंत स्वच्छ आणि रंग निघण्याचीही चिंता उरणार नाही(How to Get Rid of Mould and Mildew on Walls).

टुणुक टुणुक भोपळ्याचे ९ फायदे- आजीबाईसारखी आपल्यालाही मिळेल सुपरपॉवर! आजारांनी बेजार होणंच संपेल

भिंतींवरील बुरशीचे डाग काढण्यासाठी टिप्स

लागणारं साहित्य

लिंबू

मीठ

डिशवॉश लिक्विड

होममेड क्लीनरने स्वच्छ करा भिंतींवरचे डाग

भिंतींवरील डाग आणि बुरशी काढण्यासाठी आपण होममेड क्लीनरचा वापर करू शकता. यासाठी एका २ लिंबाचा रस घ्या. त्यात २ चमचे डिशवॉश लिक्विड आणि १ चमचा मीठ घालून मिक्स करा. तिन्ही गोष्टी मिक्स केल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. अशा प्रकारे होममेड क्लीनर वापरण्यासाठी रेडी.

अशा प्रकारे भिंतींचे कोपरे स्वच्छ करा

सर्वात आधी भिंतींचे कोपरे एका कोरड्या कापडाने पुसून घ्या. जेणेकरून बुरशी निघून जाईल. आता त्यावर तयार होममेड क्लीनर भिंती, दरवाजा किंवा खिडक्यांवर स्प्रे करा. नंतर ओल्या कापडाने पुसून काढा. डाग एकाच वाइपमध्ये निघणार नाही. ही प्रक्रिया २-३ वेळा केल्याने भिंतींवरचे बुरशीचे डाग आणि काळेपणा निघून जाईल. आपण या स्प्रेने संपूर्ण घराची भिंत स्वच्छ करू शकता.

वडिलांच्या खुन्याला शोधण्यासाठी तिनं पाहा २५ वर्षांनी काय केलं, म्हणाली-आता मला न्याय मिळाला!

बेकिंग सोडा - व्हिनेगर

आपण बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या मदतीनेही भिंतींवरचे डाग स्वच्छ करू शकता. यासाठी बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घ्या. त्याची पेस्ट तयार करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. तयार लिक्विड जिथे बुरशी असेल तिथे स्प्रे करा. आणि ओल्या कापडाने पुसून घ्या. 

Web Title: How to Get Rid of Mould and Mildew on Walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.