Join us  

पावसाळ्यात स्वयंपाक घरातल्या ट्रॉली उघडताच कुबट वास येतो? ५ उपाय करा- कोंदट वास जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2024 3:17 PM

Monsoon Tips: पावसाळ्याच्या दिवसांत स्वयंपाक घरात बसवलेल्या ट्रॉलींची थोडी विशेष काळजी घ्यावी लागते.. त्यासाठीच बघा हे उपाय...(how to get rid of musty smell or odour from kitchen trolley in monsoon)

ठळक मुद्देपावसाळ्याच्या दिवसांत किचन ट्रॉलींना येणारी दुर्गंधी घालविण्यासाठी हे काही उपाय करून पाहा..

पावसाळ्याच्या दिवसांत घराच्या स्वच्छतेकडे थोडे विशेष लक्ष द्यावे लागते. या दिवसांत थोडाही ओलसरपणा राहीला, कुठे खरकटं सांडलं की त्याभाेवती लगेच माश्या, चिलटांची भुणभुण सुरू होते. त्याशिवाय या दिवसांत वातावरणात जो ओलावा असतो, दमटपणा असतो त्यामुळे घरातल्या ठेवणीतल्या कपड्यांना, दिवाणच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या वस्तूंना, लाकडी फर्निचरला एकप्रकारचा कुबट वास येतो. असाच वास स्वयंपाक घरातल्या ट्रॉली उघडल्यावर त्यातूनही येतो. हा दर्प नाकात जाताच एकदम अस्वच्छ वाटू लागतं (cleaning tips for wooden kitchen trolley in rainy days). म्हणूनच आता किचन ट्रॉलींना येणारी दुर्गंधी घालविण्यासाठी हे काही उपाय करून पाहा...(how to get rid of musty smell or odour from kitchen trolley in monsoon?)

 

पावसाळ्यात किचन ट्रॉलीमधून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाय

१. पावसाळ्याच्या दिवसांत एक सवय स्वत:ला लावून घ्या. ती सवय म्हणजे दररोज रात्री झोपण्यापुर्वी सगळ्या ट्रॉली उघडून ठेवा. रात्रीच्यावेळी त्यांच्यातून थोडी मोकळी हवा जाऊ द्या. जेणेकरून त्या बंदिस्त जागेतला कोंदटपणा कमी होऊन वास जाईल.

तुम्हाला माहिती आहेत का ताकांचे ६ प्रकार? बघा प्रत्येक प्रकारच्या ताकाचे वेगवेगळे फायदे! 

२. पावसाळ्यात दर १५ दिवसांनी ट्रॉली बाहेर काढून घ्या आणि ती जागा घासून- पुसून स्वच्छ करा. ती जागा पुसताना पाण्यात थोडे व्हिनेगर घाला. यामुळे कोंदटपणा कमी होईल. 

 

३. किचन ट्रॉलींमधून येणारा कोंदट वास घालविण्यासाठी तुम्ही डांबर गोळ्यांचा वापरही करू शकता. 

कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

४. रात्रीच्या वेळी लिंबाचे काप करा आणि त्यावर थोडा बेकिंग सोडा टाकून ते ट्रॉलीच्या आत ठेवून द्या. यामुळे कोंदट वास निघून जाण्यास मदत होईल.

५. उदबत्तीचे रिकामे पुडेही तुम्ही ट्रॉलीच्या खाली जमिनीवर ठेवू शकता. यामुळेही दुर्गंधी कमी होऊन ती जागा सुगंधित होईल. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्ससोशल व्हायरलमानसून स्पेशल