Join us  

किचनच्या सिंकमधून घाणेरडा वास येतो? ३ पदार्थ वापरून करा 'हा' उपाय, दुर्गंधी गायब- सिंक चकाचक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 4:30 PM

Home Hacks And Cleaning Tips: किचनच्या सिंकमधून खुपच कुबट, घाणेरडा वास येत असेल तर हा सोपा घरगुती उपाय लगेचच करून बघा....(how to get rid of odour from kitchen sink?) 

ठळक मुद्देरात्रीच्यावेळी सिंक कोरडं असताना तर ही दुर्गंधी खूपच प्रकर्षाने जाणवते आणि सिंकच्या आजुबाजुला उभं राहणंही नकाे वाटतं.

स्वयंपाक घर म्हटलं की तिथे ओला कचरा तयार होतोच. खरकटं पाणी, भाज्या धुतलेलं पाणी, डाळ- तांदूळ धुतलेलं पाणी, फळांची टरफलं- सालं असं काय- काय भांडी धुताना किंवा किचनमध्ये काम करताना सिंकमध्ये जातंच. त्याला जाळी असली तरीही अन्नपदार्थांचे छोटे छोटे कण त्या जाळीतून पाईपमध्ये जातात, तिथे अडकतात- फसतात आणि कुजतात. त्यामुळे मग सिंकमधून दुर्गंधी येऊ लागते (how to get rid of odour from kitchen sink?). रात्रीच्यावेळी सिंक कोरडं असताना तर ही दुर्गंधी खूपच प्रकर्षाने जाणवते आणि सिंकच्या आजुबाजुला उभं राहणंही नकाे वाटतं. ही दुर्गंधी घालविण्यासाठी १ साधी- सोपी गोष्ट तुम्ही नक्कीच करून पाहू शकता...(2 best home remedy to remove bad smell from kitchen sink)

 

किचनच्या सिंकमधून येणारी दुर्गंधी कशी कमी करावी?

किचनच्या सिंकमधून येणारा घाणेरडा, कुबट वास कसा थांबवावा, याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ oldkitchen.shopp या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड असे ३ पदार्थ लागणार आहेत.

कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

सगळ्यात आधी तर सिंकमध्ये १ टेबलस्पून बेकिंग सोडा टाका. त्यानंतर त्यावर १ टेबलस्पून लिक्विड डिशवॉश टाका. 

हे दोन्ही पदार्थ टाकल्यानंतर पाऊण ते १ कप व्हिनेगर टाका आणि १० मिनिटांसाठी हे पदार्थ सिंकमध्ये तसेच राहू द्या. 

 

त्यानंतर त्यावर साधारण २ ग्लास उकळतं पाणी टाका. यानंतर ब्रशने सिंक घासून घ्या. 

मुलं अभ्यासाला बसायला टाळाटाळ करतात? ५ गोष्टी करून पाहा- भरपूर वेळ मन लावून अभ्यास करतील..

हा उपाय केल्यानंतर सिंकमधून येणारा कुबट, घाण वास तर निघून जाईलच. पण तुमचं सिंकही अगदी चकाचक, स्वच्छ होईल. 

हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा वेळ मिळत नसल्यास १५ दिवसांतून एकदा केल्यास तुमच्या सिंकमधून कधीही कुबट वास येणार नाही.

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलहोम रेमेडीकिचन टिप्स