Lokmat Sakhi >Social Viral > खिडकीत-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? ३ भन्नाट टिप्स; कबुतरं खिडकीजवळही फिरकणार नाहीत

खिडकीत-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? ३ भन्नाट टिप्स; कबुतरं खिडकीजवळही फिरकणार नाहीत

How to Get Rid of Pigeons : बाल्कनीत सतत येणाऱ्या कबुतरांपासून सुटका हवी असेल तर, एकदा ३ टिप्स वापरून तर पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 05:31 PM2024-01-12T17:31:56+5:302024-01-12T17:33:03+5:30

How to Get Rid of Pigeons : बाल्कनीत सतत येणाऱ्या कबुतरांपासून सुटका हवी असेल तर, एकदा ३ टिप्स वापरून तर पाहा..

How to Get Rid of Pigeons | खिडकीत-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? ३ भन्नाट टिप्स; कबुतरं खिडकीजवळही फिरकणार नाहीत

खिडकीत-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? ३ भन्नाट टिप्स; कबुतरं खिडकीजवळही फिरकणार नाहीत

बाहेर कपडे वाळत घातले, की त्यावर हमखास एक किंवा २ कबुतर (Pigeon) येऊन बसतात, आणि त्यावर घाण करून जातात. असं आपल्यासोबतही अनेकदा घडत असेल. घराच्या खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये कबुतरं येऊन आपला बसेरा तयार करतात. शहरी भागात कबुतर जास्त प्रमाणात दिसतात, आणि खिडकीबाहेर घाण करतात.

कबुतरांनी केलेल्या घाणीमुळे तसेच त्यांच्या पंखामुळे श्वानाशी निगडीत आजार निर्माण होतात. जर आपल्याही खिडकीबाहेर येऊन कबुतरं उच्छाद मांडत असतील तर, त्यांना पळवून लावण्यासाठी कोणत्या युक्त्या उपयुक्त ठरतील. शिवाय कबुतरांनी केलेली घाण साफ करण्यासाठी काय करावे? पाहूयात(How to Get Rid of Pigeons).

व्हिनेगर

बऱ्याचदा कबुतराच्या गुटूर गु आवाजामुळे जास्त त्रास होतो. घरी कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. शिवाय ते खिडकीबाहेर घाण करतात ते वेगळच. जर खिडकीबाहेर कबुतर येऊ नये असे वाटत असेल तर, व्हिनेगरचा वापर करून पाहा. व्हिनेगरच्या वापराने आपण त्यांना पळवून लावू शकता. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये ३ चमचे व्हिनेगर घाला, त्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. तयार स्प्रे खिडकीबाहेर फवारावा. व्हिनेगरच्या उग्र वासामुळे कबुतर खिडकीबाहेर फिरकणार नाही.

वजन कमी करताना ताजा की उरलेला भात खावा? उरलेला भात खाल्ल्याने खरंच वजन कमी होते?

ग्लू

कबुतरांना एकाच ठिकाणी बसायला आवडत नाही. ते सतत एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरत असतात. जर बाल्कनी बाहेर कबुतर बसू नये असे वाटत असेल तर, कट्ट्यावर ग्लू लावा. जर त्यांच्या पायांना चिकट पदार्थ चिकटला तर, त्या ठिकाणी पुन्हा येणार नाही. ग्लू ऐवजी आपण मधाचा देखील वापर करू शकता.

मिक्सरच्या भांड्यात चुकूनही वाटू नयेत ५ पदार्थ, पाती तुटतात-मिक्सरही बिघडतो सतत

काळी मिरी पावडर किंवा लाल तिखट

काळी मिरी पावडर आणि लाल तिखट यांचा वापर आपण कबुतरांना पळवून लावण्यासाठी करू शकता. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा त्यात एक चमचा काळी मिरी पावडर किंवा लाल तिखट घालून मिक्स करा. तयार स्प्रे बाल्कनी बाहेर फवारावा. लाल तिखट आणि काळी मिरीच्या उग्र गंधामुळे कबुतर खिडकीबाहेर फिरकणार नाही.

Web Title: How to Get Rid of Pigeons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.