उंदीर तुमच्या घरात नको असलेल्या पाहुण्यासारखे आहेत. दिसायला किळसवाणे असण्याव्यतिरिक्त, उंदीर रोग पसरवतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांचे आरोग्य धोक्यात आणतात. (What is the best home remedy to get rid of rats?) भिंती खराब करणं, इलेक्ट्रिकल वायरिंगला धोका पोहोचवू शकतात. (Home Tips) त्यामुळे आपले घर स्वच्छ ठेवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे उंदरांपासून कायमची सुटका कशी करावी हे शोधणे. घरातून उंदरांना आणि कॉक्रॉचेसना लांब ठेवणं एकदम सोप्पय. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. (How To Get Rid Of Rats And Cockroach)
पुदिना (Mint)
या उपायाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुमच्या घरात नेहमी फ्रेश सुवास येईल आणि उंदरांपासून मुक्त होण्यासही मदत होईल. उंदरांना पुदिन्याचा वास आवडत नाही. तुम्ही कापसाच्या गोळ्यांवर पेपरमिंट तेल देखील टाकू शकता आणि ते घराच्या प्रवेशद्वारावर किंवा या लहान प्राण्यांसाठी आरामदायक निवासस्थान असू शकते. पुदिना तुम्हाला वाटेल अशा ठिकाणी ठेवू शकता. उंदीर दूर ठेवण्यासाठी दर काही दिवसांनी या उपायाची पुनरावृत्ती करा.
कोको पावडर (Cocoa Powder)
कोरडे प्लास्टर ऑफ पॅरिस कोको किंवा चॉकलेट पावडरमध्ये मिसळावे लागेल आणि ते उंदरांच्या लपण्याच्या जागेवर पुन्हा पुन्हा पसरवावे लागेल. एकदा ते मिश्रण खाल्ल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी तुमच्या घराबाहेर पळतील आणि मरतील.
कांदा (Onion)
फक्त तुम्हालाच नाही तर उंदरांनाही कांद्याचा तिखट नकोसा वाटतो. कांदे लवकर सडतात आणि घरातील पाळीव प्राण्यांसाठी ते विषारी असू शकतात. उंदरांच्या लपण्याच्या जागेवर कांदे ठेवेल तर ते दर काही दिवसांनी बदला.
वाढलेली ब्लड शुगर झटपट कंट्रोल करतील ५ उपाय; डायबिटीस अचानक वाढण्याचं टेंशन नेहमी राहिल दूर
अमोनिया (Ammonia)
उंदरांना तीव्र वास आवडत नाही. अमोनिया लहान कपमध्ये घाला आणि उंदरांच्या आवडत्या ठिकाणी ठेवा. याच्या वासाने उंदीर तुमच्या घरातून कायमचे पळून जातील.
लसूण (Garlic)
चिरलेला लसूण पाण्यात मिसळून घरीच तुमचा स्वतः उंदीर-विरोधक तयार करू शकता. घराच्या प्रवेशद्वारावर लसणाच्या पाकळ्याही सोडू शकता. या तीव्र वासानं उंदीरही घरातून पळून जातात.
काळी मिरी (Black Paper)
उंदरांना घरापासून दूर ठेवण्याचा हा सर्वात स्वस्त मार्ग आहे. काळी मिरी शिंपडणे ही उंदरांना घरापासून दूर ठेवण्याची जुनी पद्धत आहे. घराच्या प्रवेशद्वारावर आणि इतर कोपऱ्यांवर काळी मिरी पसरवा आणि उंदरांना दूर ठेवा!
वाढलेली ब्लड शुगर झटपट कंट्रोल करतील ५ उपाय; डायबिटीस अचानक वाढण्याचं टेंशन नेहमी राहिल दूर
लवंग, लवंगाचं तेल (Cloves)
उंदरांना लवंगा आवडत नाहीत. घरातील छिद्रांजवळ लवंगाची पूड किंवा अख्ख्या कापडात गुंडाळून ठेवा. यामुळे उंदरांपासून सुटका होण्यासही खूप मदत होते.