Lokmat Sakhi >Social Viral > घरात उंदीर झाले? ३ सोपे उपाय, उंदीर होतील गायब

घरात उंदीर झाले? ३ सोपे उपाय, उंदीर होतील गायब

Home Cleaning Tips: घरात उंदरांनी धुमाकूळ घातलाय, मग हे काही उपाय तातडीने करून बघा. तुमच्या घरातून उंदीर झटपट बाहेर पडतील (How to get rid of rats from the house). 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 06:07 PM2022-10-14T18:07:45+5:302022-10-14T18:08:24+5:30

Home Cleaning Tips: घरात उंदरांनी धुमाकूळ घातलाय, मग हे काही उपाय तातडीने करून बघा. तुमच्या घरातून उंदीर झटपट बाहेर पडतील (How to get rid of rats from the house). 

How to get rid of rats from the house? Home remedies for reducing the number of chuha or rat/ mice from our house  | घरात उंदीर झाले? ३ सोपे उपाय, उंदीर होतील गायब

घरात उंदीर झाले? ३ सोपे उपाय, उंदीर होतील गायब

Highlightsयापैकी जो उपाय सोपा वाटेल तो करून बघा किंवा मग सगळेच उपाय करा. दिवाळीपर्यंत तुमचं घर उंदीरमुक्त होऊ शकतं

दिवाळीनिमित्त घराची आवराआवरी सुरू केली असेलच. आवराआवरी करताना प्रत्येकवेळी सामान बाहेर आवरताना, घरात उंदरांचा सुळसुळाट जाणवत असेल, तर हे काही उपाय लगेचच करून बघा आणि पुढचे काही दिवस सलग नियमितपणे करा. उंदरांना न मारता घराबाहेर काढण्यासाठी हे उपाय चांगले कामी येतात. यापैकी जो उपाय सोपा वाटेल तो करून बघा किंवा मग सगळेच उपाय करा. दिवाळीपर्यंत तुमचं घर उंदीरमुक्त होऊ शकतं (How to get rid of rats from the house).

 

उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी उपाय
१. कांद्याचा रस

उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी एक- दोन कांदे मिक्सरमधून काढा आणि त्याचा रस वेगळा काढून घ्या. हा रस एका स्प्रे बॉटलमध्ये काढा. आणि घरात जिथे उंदरांचा सुळसुळाट जास्त असतो, त्या ठिकाणी हा रस दिवसातून दोन वेळा शिंपडा. कांद्याच्या उग्र वासाने उंदीर दूर पळतील.

 

२. लसूण
कांद्याप्रमाणेच लसूणाचा रसही उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. यासाठी लसूण पाकळ्या मिक्सरमधून काढून घ्या.

खाऊन बघितली का पिझ्झा पाणीपुरी? हटके पदार्थ आणि त्याची भन्नाट रेसिपी

त्याची पेस्ट जेवढी असेल तेवढंच त्यात पाणी टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. घरातल्या कोपऱ्यात, अडगळीच्या ठिकाणी, कपाटाच्या- बेडच्या खाली हे लसूणाचं पाणी मारा. 

 

३. लवंग
लवंग तेल हा देखील उंदरांना घराबाहेर पळवून लावण्याचा एक चांगला उपाय आहे. कापसाचे लहान लहान बोळे करा.

दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश

हे बोळे लवंग तेलात बुडवा आणि ते एका कपड्यावर ठेवा. अशा पद्धतीने घरात ठिकठिकाणी लवंग तेलाचे बोळे ठेवा. या तेलाच्या वासामुळे उंदीर घरापासून लांब पळतील. 

 

Web Title: How to get rid of rats from the house? Home remedies for reducing the number of chuha or rat/ mice from our house 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.