Rats Home Remedies: घरात एकदा जर उंदीर आले तर बाहेर जाण्याचं नाव घेत नाहीत. अशात उंदीर घरातील वस्तू जसे की, कपडे, शूज, प्लास्टिकचे डबे, धान्य व पदार्थ कुरतडून ठेवतात. त्यांना पकडण्यासाठी पिंजरा जरी लावला तरी काही फायदा होत नाही. अशात तुम्हीही उंदरांना वैतागले असाल आणि त्यांना पळवून लावण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही काही सोपे उपाय सांगत आहोत. हे उपाय घरातून पळवून लावण्यासाठी प्रभावी ठरतात.
तुरटीची पावडर
केवळ ५ रूपयाची तुरटीची पावडर तुमच्या घरातील उंदीर पळवून लावू शकतं. ते कसं वापरावं हे जाणून घेऊ. तुरटीचा गंध आणि टेस्ट उंदरांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे जर त्यांना त्यांच्या रस्त्यात तुरटी दिसली तर ते त्यांचा मार्ग बदलतात.
अशात तुम्ही उंदीर पळवून लावण्यासाठी तुरटीचा चांगला वापर करू शकता. उंदीर पळवून लावण्यासाठी तुरटीचा वापर करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुरटीची पावडर. ५ रूपयात तुरटीची पावडर खरेदी करा. हे पावडर तुमच्या घराच्या मेन गेटच्या आजूबाजूला टाका. त्यानंतर जिथे उंदीर येतात तिथे टाका. उंदीर घरातून बाहेर जातील.
कांद्याचा करा वापर
उंदरांना पळवून लावण्यासाठी कांदा प्रभावी ठरतो. उंदरांना कांद्याचा वास अजिबात सहन होत नाही. अशात घरातील कानाकोपऱ्यात कांदा कापून ठेवा. याच्या वासानं उंदीर घरातून पळून जातील.
बेकिंग सोडा
एक कप साखर, एक कप बेकिंग सोडा, एक कप पीठ किंवा कॉर्नमीन आणि थोडं चॉकलेट पावडर घेऊन पेस्ट तयार करा. या पेस्टच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करा. ये बेकिंग सोडा बॉल्सनं उंदीर मरतात. फक्त हे घरात ठेवत असताना लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत याची काळजी घ्यावी.
काळी मिरीचं पाणी
उंदरांना पळवून लावण्यासाठी काळी मिरी देखील फायदेशीर ठरते. काळी मिरीचा गंध उंदरांना आवडत नाही. अशात काळी मिरीचं पाणी उंदरांवर शिंपडू शकता किंवा घरात उंदीर जिथे असू शकतात त्या ठिकाणी हे पाणी शिंपडा. उंदीर लगेच घराबाहेर पळून जातील.
एसेंशिअल ऑयल स्प्रे
पेपरमिंट ऑइल, लेमन ऑइल आणि सिट्रेनेला ऑइल अशा एसेंशिअल ऑइल्सचा वापरही फायदेशीर ठरू शकतो. हे ऑइल स्प्रे बॉटलच्या मदतीनं उंदरांवर शिंपडू शकता. यासाठी एक कप पाण्यात २ चमचे एसेंशिअल ऑइल टाका. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून उंदरांवर शिंपडा. तसेच हे ऑइल रूईवर टाकून घरातील कानाकोपऱ्यात ठेवा. यानं उंदीर पळून जातील.