उन्हाळ्याचे दिवस आले घरात लाल मुंग्या, पाली, झुरळं असे किटक दिसू लागतात. त्यांचा घरात अक्षरश: सुळसुळाट होतो. एखाद्या पदार्थाचा एखादा थेंब जरी सांडला तरी त्याला लगेचच लाल मुंग्या लागतात. अगदी पिठाच्या डब्यात, पोळ्यांच्या डब्यात, भाताच्या भांड्यातही कधी कधी मुंग्या दिसतात. मुंग्यांचा हा उच्छाद उन्हाळ्यात नाकी नऊ आणतो. त्याशिवाय पाली आणि झुरळांचा सुळसुळाटही वाढलेलाच असतो (How to get rid of red ants, cockroaches and chipkali in home). म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत घरात वाढलेल्या या किटकांचा बंदोबस्त करायचा असेल आणि त्यांना पुन्हा आपल्या घराकडे फिरकू द्यायचे नसेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.. (home remedies to remove ants from kitchen and house)
घरातल्या मुंग्या, झुरळं, पाली घालविण्याचा उपाय
हा उपाय करण्यासाठी आपल्याला ॲल्यूमिनियम फॉईल लागणार आहे. तुम्ही एखाद्या पार्सलसाेबत आलेलं ॲल्युमिनियम फॉईल कचऱ्यात टाकण्याऐवजी या प्रयोगासाठी वापरू शकता. याशिवाय टुथपेस्ट, साखर आणि लिंबू हे ३ पदार्थही आपल्याला लागणार आहेत.
कशाला महागडं ब्लीच, डी- टॅन फेशियल करता? फक्त ५ रुपयांत चमकेल त्वचा- बघा हा उपाय
सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ टेबलस्पून साखर, १ टेबलस्पून कोणतेही टुथपेस्ट घ्या. त्यामध्ये आता एखादे लिंबू त्याच्या सालींसकट किसून टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.
आता एक चौकोनी आकाराचा ॲल्यूमिनियम फॉईलचा तुकडा घ्या. त्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट मधोमध ठेवा. आता त्या फॉईलची गुंडाळी करा. यानंतर टुथपिक किंवा एखादी सुई, पिन घेऊन त्या ॲल्युमिनियम फॉईलच्या गुंडाळीला ७ ते ८ ठिकाणी बारीक छिद्रं पाडा.
पांढरेशुभ्र स्नीकर्स मळकट झाले? ३ पदार्थ वापरून काही सेकंदात करा चकाचक, बघा सोपा उपाय
अशा पद्धतीने तयार केलेले ॲल्युमिनियम फॉईलचे बॉल तुमच्या घरात पाली, मुंग्या, झुरळं जिथे सगळ्यात जास्त दिसतात, अशा ठिकाणी ठेवून द्या. हे बॉल जिथे असतील तिथे मुंग्या, पाली, झुरळं फिरकणार नाहीत. घरात लहान मुलं असतील तर हा उपाय अतिशय चांगला आहे. कारण यामध्ये कोणतेही रसायन असणारे औषध न शिंपडता आपण घरातले किटक बाहेर काढणार आहोत.