Lokmat Sakhi >Social Viral > स्वयंपाकघरात कोळ्यांची जळमटं सतत लागतात? ५ टिप्स- जाळीजळमटं होतील गायब

स्वयंपाकघरात कोळ्यांची जळमटं सतत लागतात? ५ टिप्स- जाळीजळमटं होतील गायब

How to Get Rid of Spider Mites Effectively घरात भिंतीवर कोळी दिसतात, जाळी विणतात, त्या त्रासावर घ्या उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 02:22 PM2023-06-15T14:22:12+5:302023-06-15T14:22:45+5:30

How to Get Rid of Spider Mites Effectively घरात भिंतीवर कोळी दिसतात, जाळी विणतात, त्या त्रासावर घ्या उपाय

How to Get Rid of Spider Mites Effectively | स्वयंपाकघरात कोळ्यांची जळमटं सतत लागतात? ५ टिप्स- जाळीजळमटं होतील गायब

स्वयंपाकघरात कोळ्यांची जळमटं सतत लागतात? ५ टिप्स- जाळीजळमटं होतील गायब

प्रत्येक घरात कोळी     आढळतात. कितीही साफ सफाई केली तरी, कोळी आपल्या घरात स्वतःचं छोटं जाळ्यांचं घर तयार करतं. वेळीच घराची साफ सफाई नाही केली तर, कोळ्यांचं जाळं घरभर पसरतं. मुख्य म्हणजे किचनमध्ये कोळ्यांचं जाळं पसरलेलं असतं. ज्यामुळे किचन खूप अस्वच्छ व घाण दिसतं.

आपला रोजचा आहार स्वयंपाक घरात तयार होतो. जर किचनमध्येच कोळ्यांचं जाळं जास्त पसरलेलं असेल तर, आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर वारंवार साफ सफाई करूनही कोळ्यांचं जाळं घरभर पसरत असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे कोळ्यांचं जाळं काढून टाकण्यास मदत होईल. व किचन स्वच्छ - सुंदर दिसेल(How to Get Rid of Spider Mites Effectively).

भिंतींवरील भेगा भरा

स्वयंपाक घरात भिंतींवर भेगा पडलेले असतात. त्या भेगांमध्ये कोळी जाळं विणतात, ज्यामुळे घरभर अस्वच्छता पसरते. या भेगांना साफ करणे देखील अवघड होऊन जाते. त्यामुळे भेगा सिमेंटने भरा. ज्यामुळे कोळी त्याच्या आत जाळं तयार करू शकणार नाही.

फ्रिजमधून खूप वास येतो? घरभर दुर्गंधी पसरते? ४ उपाय, १० मिनिटात फ्रिज होईल स्वच्छ, दिसेल चकाचक

पेपरमिंट स्प्रेचा वापर करा

किचनमध्ये जर जास्त कोळी झाले असतील तर,  पेपरमिंट स्प्रेचा वापर करा. कोळी पेपरमिंट स्प्रेच्या वासाने दूर जातात. व पुन्हा त्या ठिकाणी जाळे तयार करत नाही.

लिंबाच्या रसाचा स्प्रे तयार करा

लिंबाचा रस एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. याचा वापर किचनच्या छतावर आणि भिंतींवर करा. यामुळे घरात पुन्हा कोळी होणार नाहीत. लिंबाच्या वासाने कोळी निघून जातील.

कुलरमधून सतत कुबट वास येतो? दुर्गंधी घरभर पसरते? ४ टिप्स, कुबट वास येणार नाही..

निलगिरी किंवा केरोसीन तेलाचा वापर करा

भिंतींवर निलगिरी किंवा केरोसीन तेलाची फवारणी करा. प्रथम स्प्रे बाटलीमध्ये निलगिरी किंवा केरोसीन तेल भरून ठेवा. व हे तेल आठवड्यातून दोनदा छतावर आणि भिंतींवर शिंपडा. निलगिरी आणि केरोसीनचा वास खूप तीव्र असतो. ज्यामुळे कोळी त्या ठिकाणी पुन्हा येत नाहीत.

जाळ्यांची सफाई करा

आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून तीनवेळा संपूर्ण घराची सफाई करा. यामुळे घरात कोळी तयार होणार नाही. व कोळी हळू - हळू नाहीसे होतील.

Web Title: How to Get Rid of Spider Mites Effectively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.